In Budapest, the skydiving skydiving pilot learned! | ​बुडापेस्टमध्ये दिव्यांका त्रिपाठी शिकली घोडेस्वारी!

ये है मोहोब्बते या मालिकेचे चित्रीकरण सध्या बुडापेस्टमध्ये होत आहे. या मालिकेत दिव्यांका त्रिपाठी इशिता ही भूमिका साकारत आहे. दिव्यांकाला खऱ्या आयुष्यात घोडे फार आवडतात हे खूपच कमी लोकांना माहिती आहे. ‘ये है मोहब्बते’ या मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त सध्या ती बुडापेस्टमध्ये आहे. दिव्यांकाने अलीकडेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दिव्यांका काळ्या घोड्यावरून घोडेस्वारी करताना आपल्याला दिसत आहे. 
‘ये है मोहब्बते’ ही मालिका लवकरच लीप घेणार आहे. या मालिकेचे कथानक काही वर्षं पुढे जाणार असून मालिकेच्या कथानकाला नवी कलाटणी मिळणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण सध्या बुडापेस्टमध्ये सुरू आहे. मालिकेच्या चित्रीकरणातून वेळ काढून कलाकार तिकडच्या परिसराचा फेरफटका मारत आहेत. घोड्यावर बसून फेरफटका मारतानाचा दिव्यांकाचा फोटो पाहून तिच्या सगळ्या फॅन्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी या फोटोला लाइक देखील केले आहे. दिव्यांका ज्या गोष्टींना आयुष्यात घाबरते, त्याच गोष्टी तिला करायला आवडतात. ती एक चांगली डान्सर नसल्याने तिचे म्हणणे आहे. त्यामुळेच तिने ‘नच बलिये’ या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात जाऊन तिने डान्स तर शिकला. पण त्याचसोबत ती या कार्यक्रमाची विजेती ठरली. त्याचप्रमाणे तिला घोडे खूप आवडतात. पण त्यावर तिला बसण्याची भीती वाटते. आता बुडापेस्टमध्ये पती विवेक दाहियासोबत असताना तिने घोड्यावर बसून फेरफटका मारला. खरे तर तिला घोड्यावर बसायला भीती वाटत होती. पण तरीही तिने घोडेस्वारी केली. याविषयी
दिव्यांका सांगते, “मला लहान असल्यापासूनच घोडे फार आवडतात, पण त्यावर बसून फिरण्याची मला भीती वाटत असे. मी जर पडले, तर मला दुखापत होईल, अशी भीती मला वाटत असे. विवेकला घोडेस्वारी करायला फार आवडते आणि केवळ त्याच्या आग्रहाखातर मी घोड्यावर बसले आणि माझ्या मनातील घोडेस्वारीची भीती दूर झाली. 

Also Read : दिव्यांका त्रिपाठीने एअरलाइन्स कंपनीला सुनावले खडेबोल; पण का? वाचा सविस्तर!

Web Title: In Budapest, the skydiving skydiving pilot learned!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.