Bride Prabhashri Pradhan? ... ..yahhhhh !!! This photo is being viral on social media | नववधू तेजश्री प्रधान? …..काहीही हं !!! सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा फोटो

छोट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी जान्हवी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान. 'होणार सून मी' या घरची या मालिकेतील तेजश्रीच्या भूमिकेनं रसिकांच्या मनावर जादू केली आहे. या मालिकेनं रसिकांचा निरोप घेतला असला तरी तेजश्रीनं साकारलेली जान्हवी आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे. त्यामुळे तेजश्रीबाबतची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. तिचं सध्या काय सुरु आहे, कोणत्या मालिकेत, नाटकात किंवा सिनेमात ती काम करते याबाबत माहिती घेण्याची तिच्या फॅन्सना उत्सुकता असते. तेजश्रीचे लाखो फॅन्सला तिला सोशल मीडियावरही फॉलो करतात. सध्या सोशल मीडियावरील तेजश्रीचा एक फोटो सध्या सा-यांसाठीच चर्चेचा विषय ठरतो. विशेषतः तिच्या फॅन्ससाठी तेजश्रीचा हा फोटो उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या फोटोत तेजश्री एका नववधूप्रमाणे नटून बसल्याचे पाहायला मिळते आहे. आकर्षक अशी साडी, डोक्यावर मोठी बिंदी, नाकात भली मोठी नथ, कपाळावर सिंदूर आणि गळ्यात दागदागिने अशा अवतारात तेजश्री पाहायला मिळते आहे. या अवतारात तेजश्रीचं सौंदर्य खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे. तेजश्री फुलानं सजवलेल्या एका बेडवर बसल्याचे पाहायला मिळत आहे. आता फोटो नेमका कधीचा आणि कसला आहे अशा चर्चा सुरु आहेत. या फोटोचं वास्तव काय असे अनेक प्रश्न सध्या तेजश्रीच्या फॅन्सना पडले आहे. अभिनेता शशांक केतकरशी लग्न मोडल्यानंतर तेजश्रीनं मूव्ह ऑन करत आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. होणार सून मी या घरची ही मालिका, ही मालिका संपल्यानंतर अभिनेता प्रशांत दामले यांच्यासह कार्टी काळजात घुसली आणि अभिनेता शरमन जोशीसह मैं और तुम या नाटकातून तेजश्री रंगभूमीवर झळकली. याशिवाय ती सध्या काय करते या मराठी सिनेमातही ती झळकली. नुकतंच सूर नवा, ध्यास नवा या मराठी रियालिटी शोचं सूत्रसंचालन करतानाही ती झळकत आहे.या सगळ्या काळात तेजश्रीनं गुपचूप लग्न केले का?, हा फोटो म्हणजे तिच्या एखाद्या नव्या मालिकेमधील सीन आहे का?, किंवा मग हे एखादं फोटोशूट किंवा ऍडशूट आहे का असे अनेक प्रश्न सध्या तेजश्रीच्या फॅन्सना पडले आहेत. तेजश्रीच्या याच फोटोच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत.       

Also Read:Interview :सूत्रसंचालन करताना मुखवटा नसतो : तेजश्री प्रधान !
Web Title: Bride Prabhashri Pradhan? ... ..yahhhhh !!! This photo is being viral on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.