Boss ... is going to flow! | बस्स...बहते जाना है!


बिग बॉसच्या घरात माझे नाव गेल्या तीन-चार सीजनपासून पुढे येत आहे. परंतु कधी योग आला नाही. यावेळेस घरात जाण्यासाठी सगळ्या गोष्टी जुळून आल्या अन् मी घरात प्रवेश केला. घरात मी काय करणार हे मला अजिबात माहीत नाही. इंग्रजीतील going with the flow या म्हणीप्रमाणे मी घरात असेल. कुठलाही प्लॅन डोक्यात नाही. अशा शब्दात बिग बॉसच्या घरातील कंटेस्टेंट अभिनेता गौरव चौपडा याने सांगितले. ‘बिग बॉस सीजन - १०’च्या निमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

प्रश्न : अखेर तू बिग बॉसच्या घरात प्रवेश केला, यावेळेस नेमक्या काय घडामोडी घडल्या?
- गेल्या काही सीजनपासून बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाºया सेलिब्रिटींमध्ये माझे नाव हमखास असायचे. परंतु बिझी शेड्यूल किंवा इतर काही खासगी अडचणींमुळे मला घरात प्रवेश करता आला नाही. अखेर यावेळेस सर्व योग जुळून आले. मात्र या सर्व घडामोडी काही तासांमध्ये घडल्याने मी कुठलाही प्लॅन न करताच घरात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढे काय होईल हे आताच सांगणे मुश्लिक आहे.   

प्रश्न : सेलिब्रिटी विरुद्ध इंडियावाले असा सामना यावेळेस रंगणार आहे, काय सांगशील?
- बिग बॉसच्या प्रत्येक सीजनमध्ये नवीन संकल्पना राबविली जाते. यावेळेस इंडियावाले बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याने घरात अनेक घडामोडी घडतील यात शंका नाही. त्याचबरोबर सेलिब्रिटीची लाइफस्टाइल आणि इंडियावले यांची लाइफस्टाइल जुळवून घेण्यातही बरीचशी चढाओढ निर्माण होईल. हा खरोखर वेगळा अनुभव असेल. 

प्रश्न : तू मोबाइल अ‍ॅडिक्ट आहेस, मोबाइलपासून दूर राहणे तुला शक्य होईल का?
- मी मोबाइलपासून दूर राहू शकणार. मात्र मोबाइल माझ्यापासून किती दिवस दूर राहू शकेल याचीच मला अधिक चिंता वाटत आहे. असो हा गमतीचा भाग झाला. परंतु मला असे वाटते की मोबाइल, सोशल मीडियापासून दूर राहत आयुष्य जगणे हेच खरे चॅलेंज असेल. ते स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे. 

प्रश्न : फॅन्सकडून तुला काय अपेक्षा आहेत?
- खूप अपेक्षा आहेत. घरात त्यांनी मला तारायला हवे. हा शो पूर्णत: प्रेक्षकांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याने घरातील प्रत्येक सदस्यांचे भवितव्य प्रेक्षकच ठरणार आहेत. दरम्यान, मी माझ्या फॅन्सचे मनोरंजन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. मी कुठल्याही वातावरणात स्वत: सहज जुळवून घेत असल्याने प्रेक्षक नक्कीच मला स्वीकारतील. घरात सगळ्यांशी जुळवून घेणे, हा माझा प्रयत्न असेल. 
Web Title: Boss ... is going to flow!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.