Boman Irani plays guest artist in Khichdi? | ‘खिचडी’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत बोमन इराणी?

‘खिचडी’ लोकप्रिय मालिकेची नवी आवृत्ती नुकतीच प्रसारित होऊ लागली असून त्यात मूळ मालिकेतील प्रमुख कलाकारांना कायम ठेवतानाच निर्मात्यांनी काही नव्या व नामवंत कलाकारांना या मालिकेत पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आणले आहे.चित्रपट व नाट्य क्षेत्रात ज्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे,अशा दिग्गज कलाकारांना निर्मात्यांनी या मालिकेत पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत सादर केले आहे.आता हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी तसेच खलनायकाच्या भूमिकांसाठी प्रसिध्द असलेला अभिनेता बोमन इराणी लवकरच या मालिकेत पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत दिसेल.‘खिचडी’ मालिकेच्या निर्मात्यांशी निकटचे संबंध असलेल्या एका सूत्राने आम्हाला सांगितले, “बोमन इराणी यांच्यासारख्या हिंदी चित्रपटातील एका अतिशय दर्जेदार अभिनेत्याबरोबर चित्रीकरण करण्यास आम्ही खूप उत्सुक झालो आहोत.या क्षेत्रातील ते अतिशय उत्कृष्ट कलाकार आहेत. ते ‘खिचडी’ मालिकेतील अन्य कलाकारांबरोबर अचूक मेळ साधतील.” या मालिकेत एका जादुगाराच्या भूमिकेत बोमन इराणी दिसणार असून पारेख कुटुंबियांचे वेडेचार पाहून तोसुध्दा वेडापिसा होईल.बोमनच्या सहभागामुळे ‘खिचडी’ मालिकेचे ते भाग अधिकच रंजक आणि विनोदी होतील आणि रसिक प्रेक्षकांचे हसून हसून लोटपोट होतील असे निर्मात्यांना विश्वास आहे.


जगभरातील प्रसिद्ध लोकेशन्सनी पर्यटकांना कायम भुरळ घातलीय.याला बॉलिवूडही अपवाद राहिलेलं नाही.. स्विस एल्पस, टाइम्स स्केअर, आयफेल टॉवर, पिरॅमिड, सिडनी हार्बर, स्टॅच्यु ऑफ लिबर्टी अशा अनेक जगप्रसिद्ध वास्तूंचं दर्शन रसिकांना बॉलिवूडच्या सिनेमातून घडलंय.बॉलिवूड सिनेमांप्रमाणेच हिंदी मालिकांमध्येही फॉरेन लोकेशन्सचं दर्शन घडले आहे.आजपर्यंत विविध मालिकेत फॉरेन लोकेशन पाहायला मिळाले आहेत.आता त्यापाठोपाठ ‘खिचडी’ मालिकेतही फॉरेन लोकेशनचे दर्शन रसिकांना घडणार आहे.कारण या मालिकेचे देशातच नाही तर जगाच्या कानाकोप-यात चाहते आहे.त्यामुळे खिचडी मालिकेच्या खास भागाचे शूटिंग हे व्हेनिस येथे करण्यात आले.मात्र मालिकेच्या कथेनुसार काही भागाचे शूटिंग व्हेनिसमध्ये होवू शकले नाही. यावेळी या मालिकेच्या निर्मात्यांना पारेख कुटुंबियांना व्हेनिसमधील कालव्यांची सफर घडवून आणणा-या गोंडोलांची सफर घडवून आणायची होती. ते शक्य झाले नाही म्हणून या भागाचे आऊटडोअर शूट रद्द करावे लागले आणि त्याचे स्टुडिओतच चित्रण करावे लागले.व्हेनिसचा फिल यावा म्हणून वसई येथेच व्हेनिसप्रमाणे एक खास सेट उभारण्यात आला होता.
Web Title: Boman Irani plays guest artist in Khichdi?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.