Bollywood actress, who made her debut with 'Munni Roy' | गोल्ड चित्रपटातून मौनी रॉयशिवाय 'ही' टीव्ही अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'गोल्ड' या चित्रपटातून मौनी रॉय बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हे आतापर्यंत सगळ्यांच माहिती आहे. मात्र मौनी व्यक्तिरिक्त आणखीन एका टीव्ही अभिनेत्री गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यास सज्ज झाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार निकिता दत्ता सुद्धा गोल्ड या चित्रपटात झळकणार आहे. यात ती  अभिनेता विकी कौशलच्या लहान भावासोबत म्हणजेच सनी कौशलबरोबर काम करणार आहे. निकिताने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 
सूत्रानुसार निकिताने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडयात चित्रपटाचे काही भाग अमृतसरमध्ये शूट केला आहेत आणि अजून १५ दिवस ती अमृतसरमध्ये राहून सनी कौशलबरोबर शूटिंग पूर्ण करणार आहे. सनी आणि निकिताचे काही रोमँटिक सीन्स पण शूट केले जाणार आहे.  'गोल्ड' चित्रपटात  मुख्य भूमिकेत असलेल्या अक्षय कुमार बरोबर सुद्धा तिचे काही सीन्स आहेत जे अक्षय कुमार मुबंईत आल्यावर ते शूट केले जातील. निकिता  एक दूजे के वास्ते आणि ड्रीम गर्ल सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. टीव्ही प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर निकिता मोठ्या पडद्यावर एंट्री घेण्यास सज्ज झाली आहे.15 ऑगस्ट 2018 ला गोल्ड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  चित्रपट रिलीज व्हायला अजून जळपास वर्षभराचा कालावधी आहे. अक्षय कुमारने आपल्या बर्थ डेच्या दिवशी चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच केले होते.  हा पोस्टरवर एकीकडे अक्षय कुमाराचा फोटो होता तर दुसऱ्या बाजूला गोल्ड मेडस होते. हा चित्रपट भारतीय हॉकी संघाच्या ऑल्मपिंक गोल्ड मेडलवर आधारित आहे. यात अक्षय कुमार भारतीय हॉकी संघाचे कोच बलबीर सिंग यांची भूमिका साकारणार आहे. बलबीर  सिंग यांच्या नेतृत्वाखाली ऑल्मपिंकमध्ये भारताला तीन वेळा स्वातंत्र्यानंतर गोल्ड मेडल मिळाले होते. काही माहिन्यांपूर्वी लंडनमध्ये या चित्रपटाची शूटिंग पूर्ण करण्यात आली. यादरम्यानचे मौनी आणि अक्षय कुमारचे सेटवरच शूटिंग दरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते. त्या मौनी रेट्रो लूकमध्ये दिसली होती. 

ALSO READ : video : ​मौनी रायच्या या डान्स व्हिडिओवर तुम्हीही व्हाल ‘फिदा’!
Web Title: Bollywood actress, who made her debut with 'Munni Roy'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.