अभिजीत बिचुकलेंना ‘बिग बॉस’च्या घराबाहेर हाकला, भाजपाच्या माजी नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 11:57 AM2019-06-20T11:57:12+5:302019-06-20T11:58:20+5:30

‘बिग बॉस मराठी 2’च्या घरातील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना शोमधून हाकला, अशी मागणी आता होत आहे. ही मागणी बिग बॉसच्या स्पर्धकांची नाही तर भाजपाच्या एका माजी नगरसेविकेने ही मागणी केली आहे.

bjp ex-corporator ritu tawade demands to throw out abhijeet bichukale out of bigg boss marathi2 | अभिजीत बिचुकलेंना ‘बिग बॉस’च्या घराबाहेर हाकला, भाजपाच्या माजी नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अभिजीत बिचुकलेंना ‘बिग बॉस’च्या घराबाहेर हाकला, भाजपाच्या माजी नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देअभिजीत बिचुकले आणि संबंधित वाहिनीवर कारवाई केली नाही तर आपण आंदोलन करू असाही इशारा रितू तावडे यांनी दिला आहे.  

बिग बॉस मराठी 2’च्या घरातील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना शोमधून हाकला, अशी मागणी आता होत आहे. ही मागणी बिग बॉसच्या स्पर्धकांची नाही तर भाजपाच्या एका माजी नगरसेविकेने ही मागणी केली आहे. या मागणीसाठी या नगरसेविकेने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील एक टास्क चांगलाच वादग्रस्त ठरला होता. घरातील कामातील सहभाग आणि उत्तम कामगिरी या निकषांवर १ ते १० क्रमांकावर उभे राहण्याचा टास्क बिग बॉसने स्पर्धकांना दिला होता. या टास्कदरम्यान अभिजीत बिचुकले आणि सहस्पर्धक रूपाली भोसले यांच्यात प्रचंड वादावादी झाली होती.

अभिजीत बिचुकले खोटे बोलतात, इतरांना फसवतात, असा आरोप रूपालीने केला होता. बिचुकलेंनी हे आरोप फेटाळताच, मुलीची शपथ घ्या, असे रूपाली म्हणाली होती. ते ऐकल्यानंतर बिचुकलेंचा संताप अनावर झाला होता आणि त्यांनी रूपालीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. केवळ इतकेच नाही तर रूपालीच्या घटस्फोटाचा उल्लेखही केला होता. बिचुकले इतके संतापात होते की, त्यांनी शिव्यांचा भडीमार केला. बिग बॉसला त्यांचा हा आवाज म्यूट करावा लागला होता.

या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचुकलेंना बिग बॉसच्या घराबाहेर हाकला, अशी मागणी केली आहे. अभिजीत बिचुकलेंनी रूपाली भोसलेच्या घटस्फोटाचा उल्लेख करत, तिच्या चारित्र्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा रितू यांनी केला आहे. बिचुकलेंचे हे वक्तव्य एकल पालक महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्त्या यांचा अपमान आहे, अशी भूमिका घेत रितू तावडे यांनी   मुख्यमंत्र्यांची भेट घेत, बिचुकलेंना घराबाहेर काढण्याची मागणी केली. केवळ इतकेच नाही तर अभिजीत बिचुकले आणि संबंधित वाहिनीवर कारवाई केली नाही तर आपण आंदोलन करू असाही इशारा रितू तावडे यांनी दिला आहे.  
या प्रकरणानंतर अभिजीत बिचुकलेंवर काय कारवाई होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

Web Title: bjp ex-corporator ritu tawade demands to throw out abhijeet bichukale out of bigg boss marathi2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.