Bir Radha Shapra became the winner of Dance Plus 3, the special person dedicated to the title | ​बिर राधा शेप्रा ठरला डान्स प्लस ३चा विजेता, विजेतेपद समर्पित केले या खास व्यक्तींना

डान्स प्लस या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळेच सिझन प्रचंड हिट झाले आहेत. या सिझनची सुरुवात झाल्यापासूनच स्पर्धकांचे एकाहून एक परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक हे खूप चांगले डान्सर असल्याने या सगळ्यांमध्ये डान्स प्लसच्या तिसऱ्या सिझनचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. डान्स प्लसचा फिनाले नुकताच झाला असून विजेत्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. सगळ्या स्पर्धकांना मात देत बिर राधा शेप्रा या कार्यक्रमाचा विजेता ठरला आहे. या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवल्याबाबत बिर शेप्राला २५ लाख कॅश, एक नवी कोरी गाडी, ओपो फोन, अमेझॉनचे एक लाखाचे वॉचर्स आणि एक बाईक देण्यात आली. त्याला मिळालेल्या या यशामुळे बिर सध्या चांगलाच खूश आहे. अमरदीप संग नट्ट, आर्यन पत्रा, तरुण आणि शिवानी यांना या कार्यक्रमाचे उपविजेतेपद मिळाले. 
डान्स प्लसच्या अंतिम सोहळ्यात सगळ्या स्पर्धकांनी एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर केले. या सिझनमध्ये प्रेक्षकांना भारतीय आणि पाश्चिमात्य असे विविध नृत्य प्रकार पाहायला मिळाले होते. डान्स प्लसच्या अंतिम सोहळ्यात अधिक रंगत आणण्यासाठी एक प्रसिद्ध डान्सरने या कार्यक्रमाच्या फायनलला हजेरी लावली होती. प्रसिद्ध डान्सर प्रभू देवाने कार्यक्रमात हजेरी लावून स्पर्धकांचे मनोबल वाढवले आणि एवढेच नव्हे तर स्पर्धकांसोबत अनेक गाण्यांवर प्रभू देवाने नृत्य देखील सादर केले.
बिर हा पुनित पाठकच्या टीममधील होता. विजेतेपद मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना बिर सांगतो, या कार्यक्रमाचा मी भाग झाल्याबद्दल मी प्रचंड खूश होतो. स्टार प्लस आणि डान्स प्लसने मला एक खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिला. या कार्यक्रमात मी भाग घेतल्यानंतर या कार्यक्रमाचा मी विजेता कधी होईल याचा मी विचार देखील केला नव्हता. पण पुनित सरांनी मला खूप मदत केली. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच आज मी हे विजेतेपद मिळवू शकलो आहे. मी हे माझे यश माझी आई, पुनित सर आणि माझ्या डान्स प्लसच्या संपूर्ण कुटुंबाला समर्पित करत आहे. या सगळ्यांशिवाय हे यश मिळवणे माझ्यासाठी अशक्य होते. 

Also Read : ‘डान्स चॅम्पियन्स’मध्ये झळकणार सनम जोहर-आबिगाईल पांडे
Web Title: Bir Radha Shapra became the winner of Dance Plus 3, the special person dedicated to the title
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.