आणि लेडीज स्पेशल फेम बिजल जोशी बनली शेफ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 07:15 AM2019-02-27T07:15:00+5:302019-02-27T07:15:01+5:30

बिंदूचं काम करणाऱ्या बिजल जोशीला खाणं आणि त्यापेक्षाही स्वयंपाक करायला खूप आवडतं. ती वेगवेगळ्या प्रकारची मॅगी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

bijal joshi becomes chef on ladies special serial | आणि लेडीज स्पेशल फेम बिजल जोशी बनली शेफ

आणि लेडीज स्पेशल फेम बिजल जोशी बनली शेफ

googlenewsNext
ठळक मुद्देबिजल सांगते, "जेव्हा मी लहान होते तेव्हा आमच्या घराजवळ एक लहानसं दुकान होतं, जिथे मॅगीचे १५ प्रकार मिळायचे. त्यातले चिली गार्लिक मॅगी आणि मंच्युरियन मॅगी हे माझे आवडते प्रकार होते.मला नेहेमीच ते सगळे प्रकार शिकावेसे वाटत असे आणि म्हणून मी तिथे तासनतास बसत असे आणि त्याच्याकडून पदार्थ शिकून घेत असे. मी आजवर त्याने मला सांगितलेले त्यात घालण्याचे पदार्थ आणि कृती लक्षात ठेवली आहे.

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सर्वात वास्तववादी कार्यक्रम असणाऱ्या लेडीज स्पेशलचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत. त्यामध्ये बिंदू (बिजल), प्रार्थना (छवी) आणि मेघना (गिरीजा) या तीन काळजी घेणाऱ्या आणि स्वतंत्र महिला आहेत... ज्यांचं आयुष्य कुटुंब आणि मित्रमंडळींभोवती फिरतं. 

बिजल, छवी आणि गिरीजा या तिघींचे या मालिकेचे चित्रीकरण अनेकवेळा वेगवेगळे असते. त्यामुळे तिघींना एकत्र शूटिंग करण्याची संधी खूपच कमी वेळा मिळते. त्यामुळे जेव्हा अशी संधी मिळते तेव्हा त्याचा नक्की फायदा उठवतात. यावेळेस त्या एकत्र आल्यावर त्यांनी सेटवर मॅगी पार्टीचा बेत आखला. बिंदूचं काम करणाऱ्या बिजल जोशीला खाणं आणि त्यापेक्षाही स्वयंपाक करायला खूप आवडतं. ती वेगवेगळ्या प्रकारची मॅगी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि तिने यावेळी तिच्यासोबतच टीममधील सगळ्यांना मॅगी बनवायला भाग पाडलं. 
  
याविषयी बोलताना बिजल सांगते, "जेव्हा मी लहान होते तेव्हा आमच्या घराजवळ एक लहानसं दुकान होतं, जिथे मॅगीचे १५ प्रकार मिळायचे. त्यातले चिली गार्लिक मॅगी आणि मंच्युरियन मॅगी हे माझे आवडते प्रकार होते. त्या दुकानाचा मालक एकदम चांगला होता. त्याच्या हातात अक्षरशः जादू होती असे आम्ही म्हणायचो. मला नेहेमीच ते सगळे प्रकार शिकावेसे वाटत असे आणि म्हणून मी तिथे तासनतास बसत असे आणि त्याच्याकडून पदार्थ शिकून घेत असे. मी आजवर त्याने मला सांगितलेले त्यात घालण्याचे पदार्थ आणि कृती लक्षात ठेवली आहे. जेव्हा हे मी माझ्या सहकलाकारांना सांगितलं, तेव्हा त्यांनी मला तशीच मॅगी बनवण्याचा आग्रह केला आणि मी आनंदाने होकार दिला. तुमच्या आवडत्या लोकांबरोबर वेळ घालवताना गरमागरम मॅगी खाणं म्हणजे परमानंद आहे."

पडद्यावर एकदम गंभीर वाटणाऱ्या बिजल, छवी आणि गिरीजा या तिघी खऱ्या आयुष्यात तितकीच मजा करतात. त्या तिघींमध्ये खूपच चांगली मैत्री झाली आहे.

लेडीज स्पेशल ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळत आहे. 

Web Title: bijal joshi becomes chef on ladies special serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.