Bigg Boss12: बचना ये हसीनों म्हणत अनुपा जलोटा बिग बॉसच्या घरात परतणार, श्रीसंतचीही भावनिक रि-एंट्री, या आठवड्यात बिग बॉसच्या घरात नवा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 09:16 PM2018-10-15T21:16:56+5:302018-10-15T21:18:04+5:30

घरात कमबॅक करण्याआधी अनुप जलोटा बचना ए हसीनो गाणं गाताना दिसतील. श्रीसंतनं घरात कमबॅक करताना दीपकने त्याच्यासाठी तयार केलेलं गाणं वाजवण्यात येईल.

Bigg Boss12: Bachan is saying that Anupa Jalota will return to Bigg Boss house, Sreesanth's emotional re-entry, this week the new Big Boss house | Bigg Boss12: बचना ये हसीनों म्हणत अनुपा जलोटा बिग बॉसच्या घरात परतणार, श्रीसंतचीही भावनिक रि-एंट्री, या आठवड्यात बिग बॉसच्या घरात नवा धुमाकूळ

Bigg Boss12: बचना ये हसीनों म्हणत अनुपा जलोटा बिग बॉसच्या घरात परतणार, श्रीसंतचीही भावनिक रि-एंट्री, या आठवड्यात बिग बॉसच्या घरात नवा धुमाकूळ

googlenewsNext

बिग बॉसच्या घरातील आगामी आठवडा वेगळा ठरणार आहे. घरातील सदस्यांसाठी अधिक उत्साहवर्धक, नवे धडे देणारा आणि घरातील तणाव दूर करणारा हा आठवडा ठरेल. नेहा पेंडसे हिची बिग बॉसच्या घरातून इमोशन एक्झिटनंतर घरातील वातावरण काहीसं बदलणार आहे. एकमेकांमध्ये असलेले रूसवे-फुगवे आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न ते करतील. नव्या आठवड्याची सुरूवात दो मस्ताने चले जिंदगी बनाने या गाण्याने झाल्याचे पाहायला मिळाले. या गाण्याच्या निमित्ताने बिग बॉसच्या घरात या आठवड्यात येणाऱ्या ट्विस्टची घरातील सदस्यांना कल्पना येते. सिक्रेट रूममध्ये असणारे अनुप जलोटा आणि श्रीसंत या आठवड्यात पुन्हा एकदा घरात एंट्री मारणार आहेत. त्यांच्या एंट्रीमुळे घरातील सदस्यांना जोरदार धक्का बसणार आहे. या आठवड्यात दुसरा आणखी एक ट्विस्ट येणार आहे. आता घरातील प्रत्येक सदस्य स्वतंत्र स्पर्धक म्हणून बिग बॉसचा खेळ खेळणार आहे. सर्व जोड्यांना फोडण्यात येणार आहे. त्यामुळे काहींना आनंद तर काहींना प्रचंड धक्का बसणार आहे तर काहींना हा निर्णय पचवणं कठीण जाईल.

नॉमिनेशन प्रक्रियेसाठी जोड्यांना वेगवेगळं आमंत्रित करून दोघांपैकी एकाला नॉमिनेट करावं लागणार आहे. तर सिंगल असणाऱ्या जसलीन, दीपिका, करणवीर, सृष्टी यांना चौघांपैकी नॉमिनेशनसाठी ३ तीन नावं घ्यावी लागणार आहेत. या नॉमिनेशन प्रक्रियेमुळे काही स्पर्धक भावनिक होतील तर काहींना आपला राग अनावर होईल. सृष्टी आणि करणवीर उघड नाराजी व्यक्त करतील. तर ऊर्वशी दीपकवर आपला संताप व्यक्त करेल. यामुळे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये असुरक्षितता वाढत असल्याचे पाहायला मिळेल. 

घरात कमबॅक करण्याआधी अनुप जलोटा बचना ए हसीनो गाणं गाताना दिसतील. श्रीसंतनं घरात कमबॅक करताना दीपकने त्याच्यासाठी तयार केलेलं गाणं वाजवण्यात येईल. त्यावेळी घरातले सारेच भावुक होतील. या दोघांच्या कमबॅकमुळे आणि नॉमिनेशन प्रक्रियेतील ट्विस्टमुळे बिग बॉसच्या घरात या आठवड्यात नवा धुमाकूळ पाहायला मिळेल. अनुप-जसलीनचं काय होणार?. श्रीसंतच्या कमबॅकने घरातील वातावरण बदलणार? या सगळ्याची उत्तरं या आठवड्यात मिळतील. 

Web Title: Bigg Boss12: Bachan is saying that Anupa Jalota will return to Bigg Boss house, Sreesanth's emotional re-entry, this week the new Big Boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.