Bigg Boss11: Shilpa Shinde, who is going out of the house after the bandh, is the reason | Bigg Boss11:बंदगीनंतर घराबाहेर पडणार शिल्पा शिंदे, हे आहे कारण

या आठवड्यात शिल्पा शिंदे,लव त्यागी, प्रियांक शर्मा आणि हितेन तेजवानी नॉमिनेट झाले असून स्वत:ला सेफ करण्यासाठी आता ही सर्व मंडळी ख-या अर्थाने गेममध्ये उतरली आहेत.त्यासाठी प्रत्येक स्पर्धक वेगवेगळ्या शक्कल लढवत नॉमिनेशन पासून स्वतःला सेफ करण्याच्या प्रयत्नात दिसतोय. नुकतेच लक्झरी बजेटसाठी देण्यात आलेल्या टास्कमध्ये याची प्रचिती आली.एरव्ही कुठेही प्रियांक शर्माचा घरात दबदबा नसताना तो अचानक या टास्कमध्ये बिकनी घालत रसिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना दिसला.तर दुसरीकडे हितेनही अर्शी बनत रसिकांना फुल ऑन एंटरटेन केले.यांत सध्या शिल्पा शिंदेही तिच्या परीने रसिकांचे मनोरंजन करत आहे. तर सध्या आकाशही फुटेज मिळवण्यासाठी शिल्पासह भांडत असल्याचे पाहायला मिळतं.या सगळ्यांमध्ये शिल्पा शिंदे ही स्ट्राँग कंटेस्टंट आहे.मात्र असे काय झाले की. सगळ्यात लोकप्रिय असणा-या शिल्पालाच घराबाहेर पडावे लागले आहे. तर त्याच कारण आहे ते म्हणजे सिक्रेट हाऊस. शिल्पा शिंदेची एक्झिट होणार असे विकेंड का वॉरमध्ये दाखवण्यात येणार आहे.तिची घराबाहेर एक्झिट होणार हे खरं असून तिला एका सिक्रेट हाऊसमध्ये ठवले जाणार आहे.तिथून ती घरातल्या सगळ्या घडामोडी पाहु शकणार आहे.त्यामुळे स्पर्धकांसमोर शिल्पा शिंदेची एक्झिट होणार असल्यामुळे इतरांसाठी हा शॉकिंग वाटत असले तरी ते सेफ झाले असे त्यांना दाखवण्यात येणार आहे.मात्र शिल्पा शिंदेची एक्झिट ही फक्त त्या घरापुरतीच मर्यादित असल्यामुळे काही दिवसांनी पुन्हा तिची घरात एंट्री केली जाणार आहे.त्यामुळे आगामी भागात आणखीन रंजक खेळी घरात खेळली जाणार असल्याचे पाहायला मिळणार हे मात्र नक्की.  

Also Read:बिग बॉसच्या घराबाहेर पडताच बंदगी कालराने शेअर केला टॉपलेस फोटो!

गेल्या आठवड्यात कॉमनर म्हणून बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये सहभागी झालेली बंदगी कालरा घराबाहेर पडली. शोमध्ये बंदगी पुनीश शर्मासोबतच्या रोमान्समुळे चांगलीच चर्चेत राहिली. आता ती घराबाहेर पडताच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाली असून, तिने जबरदस्त बोल्ड पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी तिने एक फोटोशूटही केले आहे. बंदगीचे हे फोटो डब्बू रतनानी यांनी शूट केले आहेत. हे फोटो बंदगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. फोटोमध्ये बंदगी टॉपलेस अवतारात दिसत आहे. 
Web Title: Bigg Boss11: Shilpa Shinde, who is going out of the house after the bandh, is the reason
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.