Bigg Boss11: Hina Khan refused to give up the reason for menstruation, and something happened after that | Bigg Boss11:मासिक पाळीचे कारण देत हिना खानने टास्क करण्यास दिला नकार,त्यानंतर घडले असे काही

अनेकदा सेलिब्रेटी आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त आणि बेधडकपणे बोलताना दिसतात. विशेषतः लोक काय विचार करतील याचा विचार न करता व्यक्त होणाताना अनेकदा सेलिब्रेटी असे काही बोलुन जातात.त्यानंतर त्या गोष्टीचा विचार करत त्याची सारवासरव करताना दिसतात.अशी परिस्थीती हिना खानवर ओढावली होती.स्वतःला रोखठोक अभिनेत्री समजणारी हिना खान मात्र बेधडकपणे ऑन कॅमेरा मासिक पाळीचे खोटं कारण देत टास्क न करण्यासाठी पळ काढला.आता बिग बॉस हा शेवटच्या टप्प्यापर्यंत येवून पोहचला आहे.त्यामुळे आता हिना खानला आपण काहीही केले तरी बिग बॉसचे विजेतेपद जिंकु शकणार नसल्याचे वाटत असून त्यामुळे ती देण्यात येणारे टास्क मनापासून करत नसल्याचे मास्टरमाइंड विकास गुप्ताने खुलासा केला आहे.नुकतंच घरातल्या कंटेस्टंट ना एक टास्क देण्यात आला होता.त्यात विकास गुप्ता जे टास्क इतरांना सांगणार ते सगळ्यांनी फॉलो करत पूर्ण करण्याचे आदेश बिग बॉसकडून देण्यात आले होते.पुनीश शर्मा, शिल्पा शिंदे यांनी मिळालेल्या आदेशाचे पालन केले.मात्र हिना खानने मासिक पाळी असल्यामुळे स्विमिंग पुलमध्ये उतरणार नाही असे सांगत टास्कमधून पळ काढला.मास्टरमाइंड विकास गुप्तालाही हिना खोटं बोलत असल्याचे कळताच घडलेला प्रकार उघडकीस आणला.गर्ल्स प्रॉब्लेमवर अशा रितीने विकास गुप्ताने खिल्ली उडवल्याचे कारण देत हिनाने घडलेल्या प्रकारावर सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पुन्हा एकदा बिचारी बनत हिना सा-यांचे लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले असून हिनाने मासिक पाळीचे कारण देत कामातून पळ काढणे चुकीचे असल्याचे सांगत नेटीझन्सही सोशल मीडियावर हिना खानवर चांगलाच निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे.

Also Read:सलमान खानच्या घरातील या व्यक्तीला ही वाटते शिल्पा शिंदेच व्हावी बिग बॉसची विजेती

सोशल मीडियावर बिग बॉसच्या विनरच्या वोटिंगला ट्रेंडमध्ये शिल्पा शिंदेचे नाव सगळ्यात आघाडीवर आहे. शिल्पाचे फॅन्स इतर कंटेस्टंट पेक्षा जास्त आहेत यामध्ये दुम्मत नाही.शिल्पाच्या फॅन्स बद्दल बोलयाचे झाले तर सलमान खानच्या घरात सुद्धा सलमानची फॅन आहे.सलमान कोणाला सपोर्ट करतोय याचा खुलासा झाला नसला तरी सलमानची आई मात्र शिल्पा शिंदेच्या परफॉर्मेंसवर खूप खूश आहे.शिल्पा शिंदेच या सिझनची विजेती व्हावी असे सलमानच्या आईचीही इच्छा आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी वुई लव्हशिल्पा शिंदे असा हॅशटॅगचा वापर करत तिच्या फॅन्सने अनेक ट्वीट केले होते.तिच्या फॅन्सने केलेल्या ट्वीटची संख्या एक दक्षलक्षाहून देखील जास्त आहे आणि त्यामुळेच वुई लव्ह शिल्पा शिंदे हा हॅशटॅग ट्विटरच्या ट्रेंडिंगमध्ये आला आहे. 

Web Title: Bigg Boss11: Hina Khan refused to give up the reason for menstruation, and something happened after that
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.