Bigg Boss11: Hina Khan has come out of the house due to the ruckus, know what is the reason | Bigg Boss11:घराबाहेर येताच हिना खानने केला हंगामा,जाणून घ्या काय आहे कारण

'ये रिश्ता क्या कहलाता है'मालिकेतून घराघरात पोहचलेली अक्षरा म्हणजे हिना खानला याच मालिकेने अमाप लोकप्रियता मिळून दिली.त्यानंतर तिने 'खतरों के खिलाडी' 8व्या पर्वातही कंटेस्टंट म्हणून पहिला रिअॅलिटी शो केला.त्यातही सेमी फायनलपर्यंत हिना खान पोहचली होती.मात्र विजेतपद मिळवण्यात अयशस्वी ठरली.'खतरों के खिलाडी' 8व्या पर्वानंतर 'बिग बॉसच्या 11' पर्वात तिने दमदार एंट्री करत आपल्या गायकीने तर कधी घरात कंटेस्टंटसह होणा-या कॉन्ट्रोवर्सित सहभागी होत रसिकांचे मनोरंजन केले.सगळ्यात जास्त लोकप्रिय सेलिब्रेटीचा तोरा मिरवत या शोचे विजेती हिनाच ठरणार असे तिला वाटत होते.इतकेच नाहीतर बिग बॉसमध्ये एंट्री करण्याआधीच हिना खानने शोच्या फायनलपर्यंत ती असणार असा निर्मांत्याबरोबर कॉन्ट्रक्टही केला असल्याचे बोलले गेले.कॉन्ट्रॅक्टनुसार हिना खान फायनलपर्यंत पोहचणार असल्याच्या चर्चाही रंगल्या.मात्र शिल्पा शिंदे विजेती जाहीर होताच हिना खानचा पारा चढला आणि घराबाहेर येताच तिने बिग बॉसच्या टीमसह वाद घालण्यास सुरूवात केली असल्याची चर्चांना उधाण आले आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिना खान 'बिग बॉस 11'ची विजेती होण्यात अपयशी ठरल्यामुळे तिला हे अपयश पचवणे थोडे कठीण जात आहे.आता या गोष्टीत किती तथ्य आहे हे हीना आणि बिग बॉसच्या निर्मांत्यांनाच माहित. 

Also Read:Bigg Boss 11 Winner : अंगुरी भाभी ऊर्फ शिल्पा शिंदेला विजेती घोषित करताच असा केला जल्लोष!

'बिग बॉस -11' मध्ये कंटेस्टेंट्सला भरभक्कम फीस दिली गेली. सीनज 11 ची विनर शिल्पा शिंदे राहिली असली तरीही रिपोर्ट्सनुसार हिना खान या सीजनची सर्वात महागडी कंटेस्टेंट होती.तिला एका आठवड्याचे 7-8 रकोटी देण्यात आले असल्याचीही चर्चा रंगली.तसेच आतापर्यंत संस्कारी बहु म्हणून अक्षरा भूमिकेमुळे फेमस होती.मात्र या शोमुळे हिनाच्या फॅन्सला तिचे कॉन्टोवर्शियल रुपही पाहायला मिळाले.बिग बॉसचे विजेतेपद पटकावणारी शिल्पा पाचवी महिला आहे.श्वेता तिवारी पहिली विजेती होती. शिल्पासोबत विकास गुप्ता, हिना खान व पुनीश शर्मा अंतिम फेरीत होते. शिल्पाला विजेती ट्रॉफी आणि 44 लाख रूपये रोख असे बक्षिश देण्यात आले.   
Web Title: Bigg Boss11: Hina Khan has come out of the house due to the ruckus, know what is the reason
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.