'Bigg Boss' starts playing; Look forward to what? | ‘बिग बॉस’ची सुरुवात वादाने; आगे आगे देखो होता है क्या?

 
इंडियावाले आणि सेलिब्रिटी यांनी घरात एंट्री करताच बिग बॉसने टायमिंग साधत अतिशय चतुराईने फासे फेकल्याने पहिल्याच दिवशी घरातील सदस्यांमध्ये खटके उडाले आहेत. त्यामुळे आगे-आगे देखो होता है क्या? अशीच चर्चा सध्या रंगु लागली आहे.पहिल्याच दिवशी बिग बॉसने सेलिब्रिटींना इंडियावाले यांचे सेवक बनविले आहे. त्यामुळे सध्या घरातील वातावरण अतिशय तापलेले असल्याने इंडियावाले विरुद्ध सेलिब्रिटी हा सामना पहिल्या दिवसापासूनच बघायला मिळाला. त्यातच इंडियावाले हे सेलिब्रिटींना त्यांच्या आदेशावर नाचवत असल्याने ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना असेच अभिप्रेत होत आहे. दरम्यान बिग बॉसच्या या डावपेचामुळे प्रियंका आणि बानी यांच्यात खटकेदेखील उडाले. त्याचे झाले असे की, प्रियंकाने बानीला वय विचारले होते. मात्र प्रियंकाला नेमके काय विचारायचे हे बानीला समजले नसावे. त्यामुळे ती बेडरूममध्ये निघून गेली. याच कारणावरून प्रियंका आणि बानीत तु तु मै मै झाली. त्यातच सध्या मनोज आणि मनवीर आक्रमक दिसत असल्याने पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात अशांतता पसरली आहे. मनोज नॉमिनेट झाल्याने नाराज आहे, तर गौरव चोपडा याने ‘सेलिब्रिटी टीम’ असा उल्लेख केल्याने सध्या त्यांच्यात खडाजंगी निर्माण होण्याची शक्यता आहे. बाबाची फेकाफेकी घरात सध्या सर्वाधिक मजेशीर व्यक्ती म्हणून ओमजी बाबाकडे बघितले जात आहे. पहिल्या दिवसापासून बाबाच्या अजब किस्स्यांमुळे ते चर्चेत आले आहेत. दरम्यान त्यांनी आणखी एक विचित्र पद्धतीचा दावा केल्याने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांचेही चांगलेच एटरटेनमेंट होत आहे. डायनिंग टेबलवर मनोज, लोकेश, नितिभा आणि नवीन बसलेले असताना बाबाने जन्माच्या पहिल्याच दिवशी मी बोलायला लागलो होतो, असे सांगितले. याविषयी बाबा म्हणाले की, मुलं जन्मानंतर रडायला लागतात; मात्र मी बोलायला लागलो असे माझ्या गुरूजींनी मला सांगितले होते. बाबाच्या या दाव्यावर नितीन याने बाबाला तुम्ही कुठल्या भाषेत बोलले असे विचारल्यावर बाबाची बोलती बंद झाली. 
 
 
 

Web Title: 'Bigg Boss' starts playing; Look forward to what?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.