बिग बॉस मराठी २ : घरातील वाद विकोपाला... रुपाली कोणाला म्हणतेय, नोकर नाहीये मी तुझी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 01:11 PM2019-07-19T13:11:04+5:302019-07-19T13:11:46+5:30

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या मर्डर मिस्ट्री या साप्ताहिक कार्यामध्ये काल वैशाली आणि शिवचा सांकेतिक खून करण्यात शिवानी यशस्वी ठरली

Bigg Boss Marathi 2: too much fight between contestant in bigg boss house | बिग बॉस मराठी २ : घरातील वाद विकोपाला... रुपाली कोणाला म्हणतेय, नोकर नाहीये मी तुझी

बिग बॉस मराठी २ : घरातील वाद विकोपाला... रुपाली कोणाला म्हणतेय, नोकर नाहीये मी तुझी

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या मर्डर मिस्ट्री या साप्ताहिक कार्यामध्ये काल वैशाली आणि शिवचा सांकेतिक खून करण्यात शिवानी यशस्वी ठरली. आज बघूया घरामध्ये शिवानी आणि नेहा मिळून कोणाचा खून करणार आहे. काल बिग बॉस यांनी शिवला सामान्य नागरिक बनवून नेहाला खूनी केले आणि तशी सूचना अभिजीत केळकरला देखील दिली.


घरामध्ये रुपाली, नेहाची हीनासोबत वादवादी होणार आहे. हीना आणी रुपाली मध्ये किचनच्या कामावरून वाद होताना दिसणार आहे.

हीनाने नेहाला येऊन सांगितलं मला एक पोळी पाहिजे. त्यावर रूपालीचं म्हणणं पडलं लंचची ड्युटी केलीस का तू ? त्यावर हीना म्हणाली मी भांडी घासली लावली नाही जे माझं काम आहे ते मी केलं. त्यावर रूपालीचं म्हणणं पडलं, मी तुला सांगितलं होतं, घासलेली भांडी लावायची, ओटा स्वच्छ करायचा. त्यावर हीनाचं म्हणणं होतं मी ब्रेकफास्टची भांडी मी घासली. रुपाली त्यावर म्हणाली, तू नाही किशोरीताईंनी घासली आणि हीनाचा आवाज चढला. मी घासली आहेत रुपाली तू नाही नको म्हणू. त्यावर रुपालीने हीनाला खडसावले, हळू आवाजात बोल माझ्याशी “नीट बोलायचं माझ्याशी, मी नोकर नाहीये तुझी” आणि हा वाद वाढतच गेला.


हीनाने रुपालीला सांगितलं तू कॅप्टन आहेस ना मग ते काम कर. नेहाने मध्यस्ती केली आणि रुपालीला सांगितलं तिच्या तोंडाला कशाला लागतेस. हीनाने मुद्दा मांडला, एक तर आम्हांला जे जेवण पाहिजे ते नाही मिळत आम्हांला”. त्यावर नेहाने विचारले काय पाहिजे तुला जेवायला सांग. नेहा आणि हीनामध्ये वाद सुरु झाला आणि तो टोकाला गेला. नेहाचे म्हणणं होतं तो आत चुकून जरी लागला तर बाहेर जाशील.


आता वाद कुठपर्यंत जाईल ?हे पाहण्यासाठी पहा बिग बॉस मराठी सिझन २ च्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Web Title: Bigg Boss Marathi 2: too much fight between contestant in bigg boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.