Bigg Boss Marathi 2 : कानामागून आली अन् तिखट झाली...संधीचं सोन करत मिळवलं कॅप्टनपद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 12:59 PM2019-07-23T12:59:04+5:302019-07-23T12:59:21+5:30

बिग बॉसच्या घरातील या सदस्याची उत्तम कामगिरी पाहता बिग बॉसने कॅप्टनपद दिलं आहे.

Bigg Boss Marathi 2: Shivani Surve became captain of house | Bigg Boss Marathi 2 : कानामागून आली अन् तिखट झाली...संधीचं सोन करत मिळवलं कॅप्टनपद

Bigg Boss Marathi 2 : कानामागून आली अन् तिखट झाली...संधीचं सोन करत मिळवलं कॅप्टनपद

googlenewsNext


बिग बॉसच्या घरात एका आठवड्यापूर्वी परतलेली शिवानी सुर्वे आता बिग बॉसच्या घराची नवी कॅप्टन बनली आहे. शिवानीचा घरात प्रवेश होताना बिग बॉसने तिला ‘पाहुणी’ म्हणुन घरात पाठवलं होतं. पण शिवानी सुर्वेने केलेली उत्तम कामगिरी पाहता बिग बॉसने शिवानीला घराचे सदस्यत्व बहाल केलं. या संधीचं सोनं करत ‘शेरनी’ शिवानी सुर्वेनं कॅप्टनपद पटकावलं.

शिवानीला पून्हा एकदा सदस्यत्व बहाल करताना बिग बॉस म्हणाले, “गेल्या आठवड्याभरातील कार्यात दिसलेला सकारात्मक वावर, उत्साहपूर्ण सहभाग आणि कार्यातील कामगिरी या बाबी लक्षात घेता बिग बॉसच्या घरातल्या सदस्यत्वाचा दर्जा शिवानीला दिला जात आहे.”


ह्या सदस्यत्वानंतरच बिग बॉसच्या घरात हल्लाबोल हे कॅप्टनसी कार्य रंगले. मर्डर मिस्ट्री कार्यात सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वेमध्ये हे कॅप्टनसी कार्य रंगले. लिलिपूटच्या राज्याच्या ह्या कार्यात महाकाय मानव बनलेल्या शिवानीने आपल्या प्रतिमा सुरक्षित ठेवून चांगली कामगिरी केली. अभिजीतच्या सर्व प्रतिमा शिवानीच्या टीमने नष्ट केल्या आणि शिवानी विजयी ठरून कॅप्टन बनली.


सूत्रांच्या अनुसार, बिग बॉसमध्ये पहिलं पाऊल ठेवतानाच शिवानीने ती एक स्ट्राँग कंटेस्टंट असल्याचंच सर्वांना दाखवून दिलं होतं. तब्येतीच्या कारणामुळे तिला २१ दिवसांमध्येच घरच्यांचा निरोप घेऊन बाहेर पडावं लागलं होतं. पण परतताना शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या फिट होऊन २८ दिवसांनी परतलेल्या शिवानीनं पहिल्या दहा दिवसांत पुन्हा एकदा चांगल्या परफॉर्मन्सने बिग बॉसची वाहवाही मिळवली. म्हणूनच बिग बॉसनेही तिला सदस्यत्व बहाल केलं आणि ती किती स्ट्राँग खेळाडू आहे, हे तिने लगेच कॅप्टनसी टास्क जिंकुन दाखवलं.

सध्या शिवानीवर तिच्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  आता शिवानी बिग बॉस २ची विनर बनू शकते. शिवानीचे चाहतेही सध्या सोशल मीडियावरून शिवानीच्या यशासाठीच तिला शुभेच्छा देत आहेत.

Web Title: Bigg Boss Marathi 2: Shivani Surve became captain of house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.