बिग बॉस मराठी २ :अभिजीत बिचुकलेंची बिग बॉसच्या घरात नो एन्ट्री ? न्यायालयानं फेटाळला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 06:26 PM2019-06-28T18:26:45+5:302019-06-28T18:27:14+5:30

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi 2: Abhijeet Bichukale no entry in Bigg Boss house ? | बिग बॉस मराठी २ :अभिजीत बिचुकलेंची बिग बॉसच्या घरात नो एन्ट्री ? न्यायालयानं फेटाळला जामीन

बिग बॉस मराठी २ :अभिजीत बिचुकलेंची बिग बॉसच्या घरात नो एन्ट्री ? न्यायालयानं फेटाळला जामीन

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा बिग बॉसमध्ये परत येण्याचा मार्ग बंद झाला आहे.

एबीपी माझाच्या रिपोर्टनुसार, अभिजीत बिचुकले मुंबईत बिग बॉस कार्यक्रम संपल्यावर फरार होऊ शकतो, असे कारण देत सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने अभिजीत बिचुकले यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अभिजीत बिचुकले यांना चेक बाऊन्सप्रकरणी सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीने २१ जूनला अटक केली होती.

एकमेव राजकीय नेता म्हणून अभिजीत बिचुकलेने ‘बिग बॉस मराठी 2’च्या घरात एन्ट्री घेतली आणि पहिल्याच दिवशी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या आठवड्यात घरातील सर्व स्पर्धकांनी बिचुकलेला टार्गेट केले. पण  बिचकुले घरातील सगळ्यांना पुरून उरला. बिग बॉसच्या घरातील त्याचा वावर आणि त्याची भांडणे सगळेच चर्चेचा विषय ठरले.


‘बिग बॉस मराठी 2’ रंगात आला असताना गत २१ जूनला बिचुकलेला अटक झाली. सातारा पोलिसांनी एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात त्याला बिग बॉसच्या घरातून  अटक केली. त्यानंतर एका खंडणी प्रकरणातही त्याच्यावर अटकेची कारवाई झाली. दुसरीकडे तक्रारदारानेच तक्रार मागे घेतल्याने बिचुकलेंना थोडाफार दिलासा मिळाला होता. पण न्यायालयाने जामीन फेटाळल्याने अद्याप तरी त्यांचा परतीचा मार्ग बंद आहे. 


मात्र बिचुकले पुन्हा बिग बॉसच्या घरात दिसणार की नाही, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Web Title: Bigg Boss Marathi 2: Abhijeet Bichukale no entry in Bigg Boss house ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.