Bigg Boss: Day 41: Bhushan Kadu, Sharmishtha Raut and Smita have been in the process of going out of the house. | Bigg Boss Marathi Day 41:भूषण कडू,शर्मिष्ठा राऊत आणि स्मिता घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये झाले नॉमिनेट

दिवसेंदिवस बिग बॉस मराठी शोमध्ये वेगेवगळ्या हटके आयडीयाच्या कल्पना लढवल्या जात असल्यामुळे चर्चेत येत असल्याचे पाहायला मिळत आहे.असेच एक रंजक वळण पुन्हा पाहायला मिळणार आहे.बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पार सर्व सदस्यांसमोर पार पडली. हा खेळ वैयक्तिकरीत्या कसा खेळायचा हे प्रत्येक सदस्यावर अवलंबून आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही अपात्र सदस्य असतील ज्यांना अजूनही हा खेळ खेळता येत नाही अथवा हा खेळ समजण्या इतपत बौद्धिक चातुर्य नाही,म्हणूनच नॉमिनेशन प्रक्रिया सर्वांसमोर उघडपणे पार पडली.या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून घराबाहेर जाण्यासाठी शर्मिष्ठा,भूषण हे नॉमिनेट झाले तर घराची कॅप्टन सईला एका विशेष अधिकार देण्यात आला ज्यानुसार ती कोणत्याही एका सदस्याला या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट करू शकते आणि सईने स्मिताला नॉमिनेट केले. तेंव्हा या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर हे बघणे रंजक असणार आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य आता नवव्या आठवड्यामध्ये पोहचले असून संयमासोबतच आत्मनिग्रह तपासून बघण्याची वेळ आली आहे.यासाठी बिग बॉस सदस्यांवर फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत. या कार्या अंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना बिग बॉस यांनी खूप सुंदर असे सरप्राईझ देणार आहेत. आज घरामध्ये उषा नाडकर्णी यांचा मुलगा, स्मिताची आई तसेच सईची आई येणार आहेत. उषा नाडकर्णी यांचा मुलगा नंदकिशोर यांच्याप्रती त्याची नाराजगी व्यक्त करताना दिसणार आहे आणि त्यांनी जे काही केले ते चुकीचे केले असे देखील सांगणार आहेत. स्मिताची आई घरामध्ये आल्यावर पहिल्यांदा आऊ यांना भेटणार आहेत. तर सई आईला बघून खूपच भाऊक होणार आहे. प्रत्येक सदस्याच्या परिवारातील सदस्यांनी घरातील सगळ्या सदस्यांना एक संदेश दिला. आज कोणा कोणाला हे सरप्राईझ मिळेल ? कोणाचे परिवारातील सदस्य भेटायला येतील ? आणि ते काय व्यक्त होतील ? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Also Read:बिग बॉस मराठीच्या घरामधून त्यागराज खाडिलकर घराबाहेर!
Web Title: Bigg Boss: Day 41: Bhushan Kadu, Sharmishtha Raut and Smita have been in the process of going out of the house.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.