Bigg boss 12 : मोहोब्बते चित्रपटातील ही कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 06:09 PM2018-10-19T18:09:28+5:302018-10-21T08:00:00+5:30

बिग बॉस मध्ये प्रवेश येणारी ही अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. या अभिनेत्रींचे नाव किम शर्मा असून तिने शाहरुख खान,अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या मोहोब्बते या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलीवूड मधील कारकिर्दीला सुरुवात केली होती.

Bigg Boss 12: Kim Sharma to enter as a wild card contestant? | Bigg boss 12 : मोहोब्बते चित्रपटातील ही कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात?

Bigg boss 12 : मोहोब्बते चित्रपटातील ही कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात?

googlenewsNext

बिग बॉसच्या घरातून या आठवड्याला नेहा पेंडसे बाहेर पडली. नेहा ही बिग बॉस या कार्यक्रमाच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात होती. पण प्रेक्षकांची कमी मतं मिळाल्यामुळे तिला या घराच्या बाहेर पडावे लागले. नेहा बाहेर पडल्यानंतर आता एका अभिनेत्रीचा बिग बॉसच्या घरात प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. 

बिग बॉस मध्ये प्रवेश येणारी ही अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. या अभिनेत्रींचे नाव किम शर्मा असून तिने शाहरुख खान,अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या मोहोब्बते या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलीवूड मधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. किम ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या अफेअर्समुळे जास्त चर्चेत असते. ती सध्या अभिनेता हर्षवर्धन राणे सोबत नात्यात असल्याची चर्चा आहे. मुंबईतील जुहू परिसरात त्यांना दोघांना नुकतेच एकत्र पाहण्यात आले होते. तसेच नुकताच झालेल्या एका समारंभात त्यांनी हातात हात घालून एन्ट्री घेतली होती.  तेव्हापासून या दोघांच्या नात्याची चर्चा मीडियात रंगली आहे. 

किमचा काहीच वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला आहे. तिचे लग्न अली पुंजानी या व्यवसायिकासोबत झाले होते. ती लग्नानंतर काही वर्ष स्पेनला राहत होती. अली सोबत नाते संपुष्टात आल्यानंतर फॅशन डिझायनर अर्जुन खन्नासोबत असलेल्या तिच्या नात्याची चर्चा झाली होती. पण काहीच महिन्यात त्यांनी ब्रेकअप केले. अनेक कार्यक्रमात तिला आणि अर्जुन यांना एकत्र पाहण्यात आले होते. 

किम आणि क्रिकेटर युवराज सिंग यांच्या नात्याची तर एकेकाळी प्रचंड चर्चा झाली होती. ते दोघे लग्न देखील करणार असल्याचे म्हटले जात होते. पण युवराजच्या आईला हे नाते मान्य नसल्याने युवराजने हे नाते तोडले असे म्हटले जाते.  

किमच्या नात्यांमुळे तिचे आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिले आहे आणि त्यामुळेच बिग बॉस या कार्यक्रमासाठी तिचा विचार केला जात असून तिची वाईल्ड  कार्ड एन्ट्री द्वारे या कार्यक्रमात एन्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे. आता ती खरंच या कार्यक्रमाचा भाग बनते की नाही हे लवकरच कळेल. 


 

Web Title: Bigg Boss 12: Kim Sharma to enter as a wild card contestant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.