'बिग बॉस सीझन 11'चा लवकरच शुभारंभ होणार आहे. बिग बॉस 11 छोट्या पडद्यावर दाखल होण्याआधीच त्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बिग बॉसच्या घरात कोण स्पर्धक असणार, सेलिब्रिटींची नावं, यंदाचं बिग बॉसचं स्वरुप अशा विविध चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बिग बॉस सीझन-11 चे प्रोमो टीव्हीवर झळकत आहेत. या प्रोमोमधून यंदाच्या बिग बॉसची थीम ही पडोसी असणार आहे. या थीमवर आधारित बिग बॉस सीझन 11 चे प्रोमो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. शेजा-यांना स्वतःच्या जीवनापेक्षा इतरांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्याची इच्छा असते. याच थीमवर यंदाचा बिग बॉस शो आधारलेला असेल. बिग बॉस सीझन-11 च्या पहिल्या प्रोमोमध्ये सलमान घरातील सगळी कामं करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्याच वेळी सलमानची शेजारची तरुणी तिथे येते आणि तू लग्न का करत नाही असा प्रश्न सलमानला विचारते. तू अविवाहित असतीस तर तुझ्यासोबतच लग्न केलं असतं असं सलमान या तरुणीला सांगतो. बिग बॉसच्या प्रोमोत झळकलेली ही पहिली तरुणी कोण हे जाणून घेण्याची तुमची इच्छा असेलच. तर या तरुणीचं नाव अदिती सिंह असं आहे. जुन्या जमान्यातील अभिनेता जैनेंद्र प्रताप सिंह ज्यांनी 'कोहराम', 'दयावान' आणि 'दिवाना मुझसा नहीं' या सिनेमात काम केलं होतं, त्यांची अदिती ही लेक आहे. अदितीने 'गुप्पेडांथा प्रेमा' या तेलुगू सिनेमातही काम केले आहे. याशिवाय पाकिस्तानी सिनेमा 'वजूद'मध्येही ती झळकली होती. अदितीने कथ्थकचे धडेही घेतले आहेत.आता सलमान खानसह बिग बॉस-11 च्या प्रोमोमध्ये झळकण्याची संधी अदितीला मिळाली आहे.बिग बॉस-11च्या दुस-या प्रोमोमध्ये 'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉय सलमानसह झळकली आहे. दुस-या प्रोमोत सलमान खाननं टीम इंडियाची जर्सी परिधान केली असून तो क्रिकेट मॅच पाहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यावेळी त्याचे शेजारी एका पाठोपाठ मॅच पाहण्यासाठी येतात. यानंतर मागून आणखी एक तरुणी सलमानला मॅच पाहण्यासाठी येऊ का अशी विचारणा करते. ही तरुणी म्हणजेच 'नागिन' फेम अभिनेत्री मौनी राय. यावेळी सलमान तिला तिच्यासाठी बाल्कनी राखीव असल्याचे सांगतो. बिग बॉसच्या तिस-या प्रोमोमध्ये सलमान खान हा किशोर कुमार बनल्याचे पाहायला मिळत आहे. हार्मोनियम वाजवत सलमान मेरे सामने वाली खिडकीं में हा गाणे गुणगुणत असल्याचे पाहायला मिळत आहे.या तिन्ही प्रोमोवरुन यंदाचा बिग बॉस धमाकेदार ठरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.


Web Title: Bigg Boss 11: Who is the woman who has witnessed the promos of? Learn
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.