Bigg Boss 11: What happened in the Big Boss house on Oct. 11, click to learn | Bigg Boss11:काय घडले 11ऑक्टबरोला बिग बॉसच्या घरात,जाणून घेण्यासाठी क्लिक करा

रेश्मा पाटील

बिग बॉसच्या घरात प्रत्येक दिवसाची सुरुवात ही गाणं वाजवून केली जाते. सकाळी उठल्या उठल्या स्पर्धकांना गाणं ऐकवलं जातं आणि हे गाणं ऐकून स्पर्धक झोपेतून जागे होतात. असंच गाणं आजही वाजवलं गेलं. हे गाणं ऐकून आकाशला जणू काही मस्ती चढते. गाण्याच्या बहाण्याने तो ल्युसिंडाला छेडण्याचा प्रयत्न करु लागतो. ल्युसिंडा ही योगा ट्रेनर आहे. त्यामुळे ती सकाळी सकाळी योगा करत असते. मात्र त्याचवेळी तिच्यासह फ्लर्ट करण्याच्या इराद्याने आकाश तिच्याजवळ जातो. हे तू काय करत आहेस असा प्रश्न तो तिला विचारतो. मात्र ल्युसिंडा त्याला भाव देत नसल्याने आणखी खालच्या पातळीला जाऊन ही काय कामसूत्र स्टेप आहे का हसत हसत बोलतो. हे गाणं ऐकून आपण एकमेकांना किस करावं असं तुला वाटत नाही का असं बोलत आकाश ल्युसिंडाला छेडण्याचा प्रयत्न करतो. मात्र ल्युसिंडा त्याला अनुल्लेखानं मारते. आकाशचं हे वागणं बहुदा त्याला भारी पडणार असंच दिसतंय. विकेंडच्या वारमध्ये सलमान खान आकाशच्या या वागण्याचा खरपूस समाचार घेणार असंच वाटतंय. इकडे अर्शी आणि सपनामध्ये बरेच वाद होतात. अर्शी आणि सपना दोघीही संतापलेल्या आहेत. सुनो ससुरजी अब जिद छोडो...दुल्हन तो जायेगी दुल्हेराजा के साथ हे गाणं ऐकून बिग बॉसच्या घरात लग्न होणार ऐकू येतं. हितेन आणि अर्शीचं बिग बॉसच्या घरात लग्न होणार आहे. मात्र काय सुरु आहे हे सपनालाही कळत नाही. थोडं वैतागलेल्या स्वरात सपना बोलते ही बाब अर्शीसाठी चांगलीच आहे. कारण प्रत्यक्ष जीवनात लग्नात होत नाही तिचं बिग बॉसच्या घरात लग्न झालं तर चांगलंच आहे. हे ऐकून अर्शी चांगलीच भडकते. सपना उगाचच कळ काढत आहे असं अर्शी म्हणते.ये तो नाचनेवाले है असं म्हणत अर्शी सपनावर पलटवार करते. आपण गायिका असून नाचनेवाले संबोधत अर्शीने आपल्यावर प्रोफेशनली हल्ला केला आहे असं बोलत सपनाचा पारा चांगलाच चढतो. दिवसभर ती अर्शीच्या मागे मागे फिरत असते. ती जिथं जाईल तिचा सपना पाठलाग करते. हातात लाटणं, चमचा, कैची घेऊन मागे मागे जात अर्शीला त्रास देण्याचा प्रयत्न सपनाकडून होतो. हे पाहून अर्शी वैतागते. सपनाकडून आपल्या जीवाला धोका असून कन्फेशन रुममध्ये बोलावलं जावं अशी मागणी अर्शी बिग बॉसकडे कळते. दोघींमध्ये जणू काही उंदीर मांजराचा खेळ सुरु झाल्याचं पाहायला मिळतं.
 
बिग बॉसच्या घरात आज अशी गोष्ट घडली शेजारी स्वतःही घरात अॅक्टिंग करत असतात. बिग बॉसने दिलेला टास्क ते पूर्ण करत आहे. शेजारी असलेले चौघं एक कुटुंब असून त्यांचं संपत्तीसाठी भांडण सुरु आहे. प्रापर्टीबाबतची काही माहिती काही सदस्यांना माहिती नाही. तरीही आपण आपली एक्टिंग सुरुच ठेऊया असं मेहजबी सांगते. लव्ह णि शिल्पामध्ये भांडण होतं. लव्ह शिल्पाला समजावत असते की ल्युसिंडा तुझ्या आजोबाजी गर्लफ्रेंड आहे. त्यामुळे अधिक संपत्ती तिला जाणार. मात्र लव्ह भकडतो. आजोबा माझे असतील तर संपत्ती जास्त मला मिळाली पाहिजे असं तो शिल्पाला सांगतो. मात्र कोर्ट जे सिद्ध होईल त्यानुसार संपत्तीचे वाटप होईल असं शिल्पा त्याला सांगते. तुझ्या आजोबांनी खुश होऊन ल्युसिंडाला संपत्ती दिली होती आणि त्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करु नको. स्वतःच दिलेल्या टास्कमध्ये लव्ह भडकायचा अभिनय करतो आणि शिल्पावर धावून जातो. मात्र लव्हची आई (मेहेजबी) त्याला बाजूला नेते. तर कधी ती शिल्पासोबत संवाद साधताना पाहायला मिळते. आपलं किती आयुष्य राहिलं आहे, ही संपत्ती घेऊन सुखाने राहा असं नकाराश्रू दाखवत मेहेजबी शिल्पाच्या सूरात सूर मिळवते. शेजारीसुद्धा आपली हुशारी आणि कौशल्य दाखवण्यात कुठेही मागे नाहीत. राजा-रानी टास्कसुद्धा रंगणार आहे. चांगली आणि वाईट राणी ओळखण्याचा टास्क होता. हे ओळखण्याचं काम हितेनला देण्यात आलं आहे. चांगली राणी आणि वाईट राणी निवडण्याचं काम बिग बॉस हितेनला देतात. त्यानुसार चांगल्या राणीसाठी हितेन अर्शीचे नाव घोषित करतो. त्यामुळे कॅप्टनशिपची दावेदार अर्शी होते. मात्र हा टास्क हितेनला योग्यरित्या कळलाच नसल्याचे समोर येतं. ज्याने चांगला टास्ट केला ती चांगली राणी. मात्र अर्शी चांगली असल्याचा आव आणत वाईट वागते. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीच्या गळ्यात कॅप्टनशिपची माळ पडते. त्यामुळे हितेन कॅप्टनशिपच्या दावेदारीमधून बाहेर गेला. त्यामुळे आजच्या दिवसात बिग बॉसच्या घरात फार काही आग लागली नाही असंच म्हणावं लागेल. एक उडती खबर अशी आहे की पहिल्या एलिमिनेशमध्ये बाहेर गेलेला स्पर्धक विकेंडचा वारमध्ये सलमानसोबत झळकतो. मात्र पहिल्या एलिमिनेशनमध्ये बाहेर गेलेला प्रियांक विकेंडचा वारमध्ये झळकला नाही. याचाच अर्थ प्रियांक एलिमिनेट झाला नसून अजूनही लोणावळ्यातच आहे. त्याला मोबाईल देण्यात आलेला नाही. लवकरच तो बिग बॉसच्या घरात परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. आकाशला धक्का दिल्यामुळे तो बिग बॉसच्या घरातून बाहेर फेकला जाईल असं कसं होल. याआधीही बिग बॉस-7मध्ये कुशल टंडन आणि अँडीमध्ये अशीच भांडणं झाली होती. कुशलनं रागात अँडीला धक्का दिला होता. मात्र इथे भांडणं सोडवण्यासाठी प्रियांकने धक्का दिला होता. त्यामुळे तो बिग बॉसच्या घरात कमबॅक करणार असल्याची चिन्हं आहेत
Web Title: Bigg Boss 11: What happened in the Big Boss house on Oct. 11, click to learn
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.