Bigg Boss 11: Shilpa Shinde says to the sky, 'Do not Touch Me', Arshi Khan said, 'Then why ten weeks have tolerated'! | Bigg Boss 11 : शिल्पा शिंदेने आकाशला म्हटले ‘डोन्ट टच मी’, अर्शी खान म्हणाली, ‘मग दहा आठवडे का सहन केले’!

बिग बॉसच्या गेल्या सोमवारच्या एपिसोडमध्ये शिल्पा शिंदे आकाश ददलानीविरोधात आवाज उठविताना दिसली. गेल्या काही काळापासून आकाश बळजबरीने शिल्पाला स्पर्श करताना बघावयास मिळत आहे. ज्यामुळे शिल्पा स्वत: अन्कम्फर्टेबल समजत आहे. मात्र आकाशला कधीकाळी मुलगा ंमानत असल्याने, शिल्पा त्याला फारसा विरोध करण्याचे धाडस करीत नव्हती. यासाठी घरातील काही सदस्यांना आकाशला याविषयी समजाविण्यास सांगितले. त्यानुसार लव त्यागी याने आकाशला समजाविले. परंतु अर्शी खान मात्र आकाशला समजाविण्याऐवजी त्याचे समर्थन करताना दिसली. आकाश तिला गेल्या दहा आठवड्यांपासून किस करीत आहे, मग एवढा काळ सहन केले असताना आताच का विरोध केला जात आहे? असा प्रश्न अर्शीने उपस्थित केला आहे. 

दरम्यान, सोमवारच्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिल्पा किचन एरियामध्ये लव त्यागी, हितेन तेजवानी आणि पुनीश शर्माला सांगताना दिसली की, प्लीज आकाशला सांगा की, मला स्पर्श करू नकोस. कारण मला त्याचा स्पर्श इरिटेटिंग वाटत आहे. यावर हितेन म्हणतो की, शिल्पाजी हे तुम्हालाच त्याला सांगावे लागेल. यावर शिल्पा म्हणते की, मी त्याला बºयाचदा हे सांगितले परंतु तो यास चेष्टामस्करी समजतो. हितेन पुन्हा म्हणतो की, तूच त्याला याविषयी सांगायला हवे. पुढे शिल्पा म्हणते की, सुरुवातीला त्याचा स्पर्श वेगळा होता, परंतु आता त्याचा स्पर्श वेगळा आहे. त्यामुळे मला त्याचे हे वागणे अजिबात सहन न होणारे आहे. शिल्पाचे हे शब्द ऐकून लव आकाशला याविषयी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तो त्याला म्हणतो की, शिल्पाजी आपल्यापेक्षा वयाने खूप मोठी आहे. त्यामुळे तिला हे सर्व चांगले वाटत नाही. तू तिला स्पर्श करू नकोस. लवचे हे शब्द ऐकून आकाश म्हणतो की, आता मी तिला स्पर्श करणार नाही. यासाठी शिल्पा लवचे आभारही मानते. याच विषयावर काही वेळानंतर हिना खान, अर्शी खान आणि विकास गुप्ता यांच्यात चर्चा होती. हिना म्हणते की, शिल्पा वयाने खूप मोठी आहे, शिवाय स्ट्रॉन्गही आहे. त्यामुळे तिने स्वत:च याविषयी आकाशला सांगायला हवे. मात्र मध्येच लव म्हणतो की, तो तिचे म्हणणे ऐकत नाही त्यामुळेच मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावर बोलताना विकास म्हणतो की, मी पहिल्यादा शिल्पाच्या तोंडून हे ऐकले की, सुरुवातीला तिला हे सर्व चांगले वाटत होते, परंतु आता तसे वाटत नाही. यावर अर्शी म्हणते की, गेल्या दहा आठवड्यांपासून शिल्पा आणि आकाश एकमेकांना स्पर्श करीत आहेत. आता अचानकच ११व्या आठवड्यात तिला आकाशचा स्पर्श का नकोसा वाटत आहे. काही दिवसांपूर्वीच आकाशने शिल्पाला बळजबरीने किस केले होते. तेव्हापासून शिल्पा आकाशच्या या स्वभावामुळे वैतागली आहे. 
Web Title: Bigg Boss 11: Shilpa Shinde says to the sky, 'Do not Touch Me', Arshi Khan said, 'Then why ten weeks have tolerated'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.