Bigg Boss 11: Shilpa Shinde and Vikas Gupta's 'Yarana'! | Bigg Boss11: शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांचा 'याराना'!

'बिग बॉस'च्या घरात काहीही घडू शकते हे आजपर्यंत सर्वांना माहिती झालेच आहे.या घरात स्पर्धक कधी एकमेकांचे शत्रु असतात तरी कधी मित्र.प्रत्येकजण काही ना काही उद्देशानेच घरात एंट्री मारतो.मात्र या घरात कोण कधी पलटी मारेन सांगणे जरा कठिणच.होय,रिअल लाईफमध्ये एकमेकांचे शत्रु बनलेले अचानक बिग बॉसच्या घरात एंट्री करताच मित्रही बनतात.या गोष्टी आजवर या घरात अनेकदा आपण पाहिल्या आहेत.आता पुन्हा एका स्पर्धकांनी एकमेकांना मैत्रीचा हात पुढे केला आहे.'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगुरी भाभीमुळे लोकप्रिय बनलेली शिल्पा शिंदे आणि विकास पहिल्या दिवसांपासून जोरदार खटके उडत असल्याचे पाहायला मिळाले.


छोट्या छोट्या गोष्टीवरून या दोघांमध्ये वाद रंगल्याचे पाहायला मिळाले.मात्र असे अचानक काय घडले की या दोघांनी त्यांच्यामधल्या वादाचे रूपांतर मैत्रीत झाले.नेहमीच त्या एका गोष्टीवरून शिल्पा विकासला टोमणे देताना ऐकायला मिळायचे.मात्र बिग बॉसच्या घराबाहेर आधी जे काही त्यांच्या दोघांत घडले ते सगळं काही विसरून विकासला शिल्पासह मैत्री करायची आहे.त्यामुळेच त्याने शिल्पाची समजुत काढत सगळ्या गोष्टी विसरून नव्याने त्यांच्या मैत्रीला सुरूवात करू असे सांगत तिच्या कपाळावर किस केले.शिल्पाही विकासच्या वागण्यात आलेला हा बदल बघून थोडी आश्चर्यचकित झालेली दिसली.मात्र काही मिनिटातच पुन्हा एकदा त्यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले.बिग बॉसने दिलेला टास्कमध्ये विकासच्या डोळ्याला इजा होते आणि इतर स्पर्धकांना कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून विकास इतरांना कशाप्रकारे खबरादारी घेण्यास सांगत असतो.त्याचवेळी विकास टास्कमध्ये लुडबुड करत असल्याचे पाहाताच शिल्पा त्याच्या पाठीवर मारते.त्यामुळे विकास पुन्हा शिल्पावर भडकतो.प्रकरण वाढु नये म्हणून त्याचवेळी शिल्पाने विकासला मारले नसून फक्त साईडला होण्यासाठी दिलेला इशारा होता असे सांगत ते प्रकरण तिथेच मिटवण्याचा प्रयत्न करते.तुर्तास या दोघांच्या अशा वागण्यामुळे दोघांनी सगळे वाद विवाद विसरून मैत्री करायचे ठरवले असणार असेच दिसतयं.
Bigg Boss 11 : जुबेर खानने म्हटले, ‘सलमान खान नपुंसक असल्यानेच त्याचे लग्न होत नाही’!
Web Title: Bigg Boss 11: Shilpa Shinde and Vikas Gupta's 'Yarana'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.