Bigg Boss 11: Salman Khan's bodyguard lodged against him, controversy over Bigg Boss case | Bigg Boss 11: सलमान खानच्या बॉडीगार्डविरोधात गुन्हा दाखल,बिग बॉस प्रकरणातील वाद टोकाला

बिग बॉस आणि वाद हे जणू समीकरणच बनले आहे. गेल्या दहा सीझनपासून सुरु असलेली वादाची परंपरा यंदाही कायम आहे.बिग बॉस सीझन 11 सुरु होऊन 2 आठवडेच झाले. त्यानंतर लगेचच बिग बॉसमध्ये मोठा वाद घडला. बिग बॉस शोचा होस्ट सलमान आणि बिग बॉसच्या घरातील स्पर्धक जुबैर खान यांच्यात प्रचंड वादावादी झाली. हा वाद इतका टोकाला गेला की जुबैरनं सलमानला थेट धमकी दिली. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता एक नवं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात आता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याचं नाव समोर आलं आहे.शेराविरोधात मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शबनम नावाच्या तरुणीने शेराविरोधात तक्रार दाखल केली होती.बिग बॉसमधील वादानंतर शबनम हिने जुबैरला मदत करत पाठिंबा दर्शवला होता. यानंतर संतापलेल्या शेराने फोन करुन आपल्या शिवीगाळ केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप शबनमने आपल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरुन शेराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नव्या प्रकरणामुळे शेराच्या अडचणी वाढल्याच आहेत.मात्र यासोबतच सलमान खान,बिग बॉस प्रसारित करणारी वाहिनी यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


Also Read:Bigg Boss 11: ​ घाबरायला मी विवेक ओबेरॉय नाही; कुठे भेटू ते सांग! जुबैर खानने सलमान खानला दिली धमकी!

‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक घटना घडली होती. कंटेस्टंट जुबैर खान याच्यावर सलमान चांगलाच संतापला. ‘ जब तुम यहां आए थे तो तुम्हारी कोई औकात वैसे ही नहीं थी.  यह किसी का दामाद नहीं है. जिस परिवार से यह अपना नाम जोड़ता है इसका उससे कोई लेना-देना नहीं है.  अपनी औकात दिखानी है न तो निकाल गंदगी मेरे सामने. जुबैर यहां अपनी इमेज बनाने आया है या इमेज डुबाने आया है,’असे सलमान नॅशनल टीव्हीवर जुबैरला बोलला होता. जुबैर टेन्शनमध्ये आला आणि त्याने खूप सा-या गोळ्या खाल्लया. यानंतर जुबैरला तात्काळ रूग्णालयात भरती करण्यात आले होते.त्यानंतर लोणावळा येथील पोलिस स्टेशनमध्ये  जुबैरने सलमानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. सलमानने बिग बॉस या कार्यक्रमात मला धमकी दिली असून तू घरातून बाहेर पडल्यावर इंडस्ट्रीत तू काम करू शकणार नाही नाही असे मला धमकी देताना तो म्हणाला. तसेच तू घर सोडल्यावर मी तुला माझा कुत्रा बनवणार आहे.तसेच तू बाहेर ये,तुला मी सोडणार नाही असे कॅमेऱ्याच्यासमोर सलमानने म्हटले असल्याचे जुबैरने तक्रारीत नमूद केले होते. 
Web Title: Bigg Boss 11: Salman Khan's bodyguard lodged against him, controversy over Bigg Boss case
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.