Bigg Boss 11: Rasa from the Big Boss house; The sky climax reached 150 km ahead of the brutality! | Bigg Boss 11 : बिग बॉसच्या घरात किसवरून राडा; आकाश ददलानीने १५० कामेऱ्यांसमोर गाठला निर्लज्जपणाचा कळस !

बिग बॉसचा सीजन ११ आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असून, घरात स्पर्धकांमध्ये घमासान बघावयास मिळत आहे. या आठवड्यात शिल्पा शिंदे, लव त्यागी, प्रियांक शर्मा आणि हितेन तेजवानी नॉमिनेट झाले असून, स्वत:ला सेफ करण्यासाठी आता ही सर्व मंडळी खºया अर्थाने गेममध्ये उतरली आहे. परंतु घरात सध्या वेगळेच प्रकरण गाजत असून, त्यावरून स्पर्धकांमध्ये अक्षरश: राडा झाला आहे. होय, गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात किस प्रकरण चांगलेच चर्चिले जात आहे. त्याचे झाले असे की, आकाश ददलानी शिल्पा शिंदेला वारंवार बळजबरीने किस करीत असल्याने शिल्पाने त्याच्याविरुद्ध आवाज उठविला आहे. वास्तविक आकाश शिल्पाला ‘मां’ म्हणत असल्याने सुरुवातीला हे सर्व काही आई-मुलाच्या पवित्र नात्यात होत असल्याचे तिला वाटत होते. परंतु आकाशकडून बळजबरी केली जात असल्याने, शिल्पाला आता आकाशचा स्पर्श नकोसा झाला आहे. 

मात्र अर्शी खानने आकाशच्या बाजूने बोलताना शिल्पा शिंदेवर निशाणा साधल्याने किस प्रकरणावरून घरात राडा होत असल्याचे बघावयास मिळत आहे. वास्तविक शिल्पाने लव त्यागीच्या माध्यमातून आकाशला समजावण्याचा प्रयत्न केला. आकाशनेदेखील शिल्पाची माफी मागितली. परंतु शिल्पाकडून केलेला आरोप त्याला खटकत असल्याने तो वारंवार या विषयावरून शिल्पावर निशाणा साधत आहे. शिल्पाच्या वयाच्या विचार न करता तो बिंधास्तपणे तिच्याविरोधात बोलत आहे. विशेष म्हणजे, अर्शी खान त्याला समर्थन देत असल्याने आकाशचा उद्धटपणा वाढतच चालला आहे. त्याने तर घरातील १५० कॅमेºयांसमोर बिंधास्तपणे जाहीर केले की, मी तुला किस करणार नाही परंतु अर्शीला किस करीत राहणार. विशेष म्हणजे, अर्शीदेखील आकाशच्या या वक्तव्याचे समर्थन करीत असल्याने हे दोघे बिंधास्तपणे कॅमेºयासमोर किस करताना दिसले. दोघांचे कृत्य निर्लज्जपणाचा कळस गाठणारे असून, प्रेक्षकांमध्ये त्यांच्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दोघांचा हा प्रकार घरातील अन्य सदस्यांकरिता धक्कादायक होता. कारण आकाशने अर्शीच्या गालावर नव्हे तर लिप्सवर किस केल्याने सगळेच अवाक् झाले. शिल्पाने तर आकाशला यावरून फटकारण्याचा प्रयत्नही केला. परंतु आकाशचा उद्धटपणा याठिकाणीदेखील दिसून आला. त्याने शिल्पाला म्हटले की, जर अर्शीला यात काही वावगे वाटत नाही तर तू आमच्यात का बोलतेस? मी अर्शीसोबत तोपर्यंत हे सर्व काही करणार जोपर्यंत ती मला यावरून बोलत नाही. त्यामुळे सध्या घरात किस प्रकरणावरून वातावरण तापले असून, आकाश आणि अर्शी कोणत्या पातळीवर गेम खेळतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 
Web Title: Bigg Boss 11: Rasa from the Big Boss house; The sky climax reached 150 km ahead of the brutality!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.