Bigg Boss 11: Priyank Sharma's girlfriends get triple amount of drama in the house? | Bigg Boss 11 : घरात ड्रामा करण्यासाठी प्रियांक शर्माच्या गर्लफ्रेंडला मिळाली तिप्पट रक्कम?

बिग बॉसच्या घरात वाद नेहमीच बघावयास मिळतात, परंतु काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्याच घरात चक्क नॅशनल टीव्हीवर ब्रेकअप बघावयास मिळाले. होय, गेल्या आठवड्यात प्रियांक शर्माची गर्लफ्रेंड दिव्या अग्रवाल हिला बिग बॉसच्या घरात एंट्री देण्यात आली होती. दिव्याने घरात एंट्री करताच प्रियांकला गाठले. तिने त्याला खूप खरीखोटी सुनावली. तसेच सर्वांसमोर ब्रेकअप झाल्याचेही ठणकावून सांगितले. वास्तविक प्रियांकला अपेक्षा होती की, त्याला भेटण्यासाठी मम्मी किंवा पापा येतील. परंतु सगळेकाही उलटे घडल्याने प्रियांकलाही धक्काच बसला. आपल्या एक्स गर्लफ्रेंडला अचानक समोर बघून प्रियांक चांगलाच धास्तावला होता. परंतु गर्लफ्रेंड समोर बसून रडत असल्याचे बघून त्याचेही डोळे पाणावले. 

परंतु जेव्हा दिव्याने ब्रेकअप झाल्याचे सांगितले तेव्हा घरातील सर्वच सदस्यांना धक्का बसला. एवढेच काय तर वीकेंड का वारमध्येही सलमानने प्रियांक-दिव्या ब्रेकअप प्रकरणाची चांगलीच खिल्ली उडविली. त्याने प्रियांकला हे काय होते, असे विचारले. दरम्यान, हा सर्वप्रकारानंतर याच अनुषंगाने एक बातमी समोर येत आहे. होय, सूत्रानुसार प्रियांकच्या एक्स गर्लफ्रेंडला घरात येऊन ड्रामा करण्यासाठी खूप मोठी रक्कम दिली गेली. कदाचित हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल, परंतु हे खरं आहे. फिल्मी मंकी रिपोर्टनुसार, दिव्याला बिग बॉसच्या निर्मार्त्यांनी घरात जाऊन प्रियांकसमोर ड्रामा करण्यासाठी तब्बल तीन पट रक्कम दिली. 

रिपोर्टसनुसार असेही बोलले जात आहे की, दिव्याने प्रियांकसमोर जे काही सांगितले ते सर्व स्क्रिप्टेड होते. वास्तविक दिव्या सुरुवातीला घरात येण्यासाठी तयार नव्हती. शिवाय प्रियांकही मम्मीने घरात यावे अशी अपेक्षा ठेवून होता. परंतु मोठी रक्कम आॅफर केली गेल्याने दिव्याने शोमध्ये येण्यास समर्थता दर्शविली. आयबीटी टाइम्सने ट्विट करताना लिहिले की, दिव्याला हा सर्व ड्रामा करण्यासाठी घरातील सदस्यांच्या तुलनेत तिप्पट रक्कम दिली गेली. यामागील वास्तव काय आहे हे जरी सध्या स्पष्ट होत नसले तरी, असे जर घडल्यास बिग बॉसची विश्वासार्हता नक्कीच धोक्यात येईल यात शंका नाही. 
Web Title: Bigg Boss 11: Priyank Sharma's girlfriends get triple amount of drama in the house?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.