Bigg Boss 11: Jubair Khan shared video; You will be shocked to hear about Salman Khan's disclosures! | Bigg Boss 11 : जुबेर खानने शेअर केला व्हिडीओ; सलमान खानबद्दलचे खुलासे ऐकून तुम्हाला धक्का बसेल!

‘बिग बॉस सीजन ११’ सुरू होऊन एकच आठवडा झाला अन् घरातील भांडण चक्क  चव्हाट्यावर आले. होय, बिग बॉसचा स्पर्धक राहिलेला जुबेर खान पहिल्याच आठवड्यात सलमान खानच्या रडारवर आल्याने या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. सध्या जुबेर आणि सलमानमध्ये जबरदस्त कोल्ड वॉर सुरू असून, जुबेरकडून दर दिवसाला वेगवेगळे आरोप केले जात आहेत. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर जुबेरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यामध्ये त्याने सलमानवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहेत. त्याचबरोबर कलर्स या वाहिनीने माझी बदनामी केल्याने त्यांना न्यायालयात खेचणार असल्याचा इशाराही दिला आहे. 

व्हिडीओमध्ये जुबेरने म्हटले की, ‘मला बिग बॉसच्या घरातून काढले नाही, तर मी स्वत:हून बाहेर आलो आहे. कारण बिग बॉसच्या घरात सगळे काही चुकीचे घडत आहे. मी त्याविरोधात आवाज उठविला. ज्यांच्यात दम नाही ते शांत आहेत. कारण ते सलमानला घाबरतात. वास्तविक मी नॅशनल टीव्हीवर सलमानची इज्जत राखली. मात्र अशातही त्याने म्हटले की, मी भाई लोकांना घाबरतो. असे काहीही नसून, उलट सलमानच या भाई लोकांचा चमचा आहे. मी हसीना पारकरचा जावई आहे, असे मी कधीच म्हटले नाही. गेल्यावर्षी जेव्हा ही कॉन्ट्रोर्व्हशी झाली होती तेव्हा मी माझ्या सासूचे नाव रिव्हिल केले होते. त्याबाबतचा एक व्हिडीओदेखील आहे. मी ३० तारखेला बिग बॉसच्या घरात गेलो होतो. माझ्याकडून माझा फोन घेण्यात आला. त्यामुळे कलर्सवाले माझा कोणता प्रोमो चालवित होते, याविषयी मला काहीच माहिती नव्हते. मी घरातील मुलीशी उद्धट वागतो असे दाखविण्यात आले. परंतु ते सर्व माझे फनी व्हिडीओ होते. 

">

पुढे बोलताना जुबेरने म्हटले की, ‘खरं सांगायचे म्हणजे सलमानवर भाई लोकांचा प्रेशर आल्यानेच तो माझ्याशी उद्धट वागला. सलमान काय एवढा सभ्य आहे काय? त्याने कधी कोणाला शिवीगाळ केली नाही का? शिव्या देतानाचे त्याचे कितीतरी व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अर्शी खान आमच्या जेवणात थुंकली होती. तिने ‘कुराण’चा अपमान केला. घरात असलेला विकास गुप्ता गे आहे. अशा परिस्थितीत मी घरातील इतरांसाठी स्टॅण्ड घेतला. मी अर्शी खानसारख्या उद्धट मुलीला धडा शिकविला. पण कलर्स चॅनेलने माझा टीआरपीसाठी वापर केला. हे पूर्णत: चुकीचे आहे. 

सलमानबद्दल बोलताना जुबेर म्हणाला की, सगळ्यांनाच माहिती आहे की, सलमानच्या चित्रपटांना कोण पैसा पुरवितो. सलमानचे भाईलोकांसोबतचे फोटो लोकांना चांगले माहिती आहेत. त्याच्या ‘चोरी-चोरी’ या चित्रपटाला कोणी पैसा लावला होता हे सगळ्यांनाच माहिती आहे. सलमानची मी सर्व पोलखोल करणार असल्याचेही जुबेर व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतो. दरम्यान जुबेरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून, त्याने केलेल्या खुलाशांमुळे एकच खळबळ उडाली आहे. 
Web Title: Bigg Boss 11: Jubair Khan shared video; You will be shocked to hear about Salman Khan's disclosures!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.