Bigg Boss 11: 'ha' dress for applying Arshi Khan for Big Boss Finale; Push the basel after reading the price! | Bigg Boss 11 : बिग बॉसच्या फिनालेसाठी अर्शी खान परिधान करणार ‘हा’ ड्रेस; किंमत वाचून तुम्हाला बसेल धक्का!

बिग बॉस ११च्या फिनालेमध्ये कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन अर्शी खान हिचा अंदाज कसा असेल? याविषयी दररोज नवीन चर्चा रंगत आहे. मात्र आता याबाबतचा खुलासा झाला असून, अर्शी फिनालेसाठी खास तयारी करीत आहे. अर्शीने तिच्या केसांची नवी स्टाइल केली असून, फॅशन डिझायनर रियाज गंगजीने डिझाइन केलेला ड्रेस ती परिधान करणार आहे. आता तुम्ही म्हणाल की, यात विशेष बातमी काय आहे? तर अर्शी जो ड्रेस परिधान करणार आहे, त्या ड्रेसची किंमत ६.२५ लाख रूपये इतकी आहे. या ड्रेसवर स्वारॉस्की आणि पर्ल्सचे काम करण्यात आले आहे. 

काही दिवसांपूर्वीच अर्शी खानचा एक फोटो लीक झाला. ज्यामध्ये ती रियाज गंगजीच्या बुटीकमध्ये बघावयास मिळत आहे. खरं तर अर्शीने बराच विचार केल्यानंतर हा ड्रेस परिधान करण्याचा निर्णय घेतला आहे. रियाजनेदेखील या वृत्तास दुजोरा दिला आहे. मात्र त्याने याविषयी आणखी माहिती देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. वास्तविक अर्शी जो ड्रेस परिधान करणार आहे, तो वाइन कलरच गाऊन असेल, ज्याला फ्यूजन आउटफिट असे म्हटले जाते. अर्शी खानची पब्लिसिस्ट आणि मॅनेजर फ्लिन रेमेडिओजने म्हटले की, रियाज अर्शी खानच्या फेव्हरेट फॅशन डिझायनरपैकी एक आहे. त्यामुळे अशा मोठ्या कार्यक्रमात रियाजची निवड केल्यास नवल वाटू नये. वृत्तानुसार, फिनालेमध्ये अर्शी खान हितेन तेजवानी याच्यासोबत परफॉर्मन्स करताना बघावयास मिळणार आहे. 
Web Title: Bigg Boss 11: 'ha' dress for applying Arshi Khan for Big Boss Finale; Push the basel after reading the price!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.