Bigg Boss 11: Arshi Khan, video viral seen in pornography! | Bigg Boss 11 : मैत्रिणीबरोबर अश्लीलपणा करताना दिसली आर्शी खान, व्हिडीओ व्हायरल!

सध्या सलमान खान होस्ट असलेला ‘बिग बॉस’ हा शो छोट्या पडद्यावर धूम करीत आहे. शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक एकापेक्षा एक असल्याने घरात सध्या चांगलीच रंगत आली आहे. दिवसागणिक घरात वाद होत असल्याने स्पर्धकांचे स्वभाव समोर येत आहेत. विशेष म्हणजे या सीजनमध्ये पुरुषांनी नव्हे तर स्त्री कलाकारांनी घरावर कब्जा केल्याने शोमधील रंगत आणखीनच वाढली आहे. त्यातच आर्शी खान, हिना खान आणि शिल्पा शिंदे या त्रिकुटांनी घरातील वातावरण अक्षरश: कलुषित केल्याने इतरांना घरात जगणे मुश्किल झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या शोमधील स्पर्धक आर्शी खान हिचा करारनामा सांगणार आहोत. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून आर्शीचा एक व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असून, त्यामध्ये ती तिच्या मैत्रिणीसोबत अश्लीलपणा करीत असल्याचे दिसत आहे. 

खरं तर आर्शी बिग बॉसच्या घरात येण्याअगोदरच वादग्रस्त गोष्टी करून बसली आहे. सोशल मीडियावर तिचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ बघून ते स्पष्टही होते. या व्हिडीओमध्ये ती मैत्रिणीबरोबर मस्ती करताना दिसत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची गर्लफ्रेंड असल्याचे सांगणाºया आर्शीचा हा व्हिडीओ खरं तर प्रेक्षकांसाठी धक्कादायकच ठरत आहे. बिग बॉसच्या घरातील आर्शी एकमेव अशी स्पर्धक आहे, जी शोच्या पहिल्या दिवसापासूनच वादग्रस्त ठरत आहे. कधी कोणाशी वाद घालत आहे, तर कधी कोणावर प्रेमाचे जाळे फेकत आहे. घरातील इतर स्पर्धकांबरोबर वाद घालण्यात तर आर्शीचा हातखंडाच म्हणावा लागेल. काही दिवसांपूर्वी जेव्हा सब्यसाचीने तिला ट्रान्सजेंडर असे म्हटले होते तेव्हा आर्शी चांगलीच संतापली होती. यावर जेव्हा विकास गुप्ताने आर्शीची समजूत काढली होती तेव्हा आर्शीने विकासला म्हटले होते की, मी घरी नकाब घालून वावरते. परंतु आर्शी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ज्या पद्धतीने हावभाव करीत आहे, त्यावरून ती स्पष्ट खोटं बोलत असावी, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण व्हिडीओमध्ये आर्शीचे हावभाव खूपच विचित्र असून, चाहते तिचा हा व्हिडीओ बघून अवाक् झाले नसतील तरच नवल. 
Web Title: Bigg Boss 11: Arshi Khan, video viral seen in pornography!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.