Bigg Boss 10: Monolitha gained popularity, now in Asia, Asia | Bigg Boss 10:मध्ये मोनालिसाने मिळवली लोकप्रियता,आता मुंबईत घेतला आशियाना

लवकरच बिग बॉस 11 सिझन रसिकांच्या भेटीला येणार आहे. सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉसची ओळख. ज्याला कोणी ओळखत नाही अशाला लोकप्रियता मिळून देणा-या या शोमध्ये सहभागी होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यानंतर सेलिब्रेटी बनल्यानंतर त्यांच्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यापैकीच एक स्पर्धक म्हणजे भोजपुरी सिनेमाची हिरोईन मोनालिसा बिग बॉसच्या 10 व्या सिझनमध्ये झळकली. वर्षभरापूर्वी भोजपुरी इंडस्ट्री सोडली तर  कोणीच तिला ओळखत नव्हते अचानक बिग बॉसच्या घरामुळे मोनालिसाची तुफान  चर्चा झाली. बिग बॉसच्या घरात होणारे वादविवाद, अचानक फुलणारे प्रेमअंकुर असे अनेक गोष्टींमुळे मोनालिसा बिग बॉसमध्ये हिट ठरली. बिग बॉस 10चा विजेता ठरलेला मनु पंजाबी आणि भोजपुरी हिरोईन मोनालिसा या दोघांचा बिग बॉसच्या घरात रोमाँटीक अंदाज पाहायला मिळाला . आता पुन्हा एकदा मोनालिसा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिच्या विषयी एक गोष्टींवर चर्चा रंगतेय. ती म्हणजे वर्षही झाले नाही आज स्वप्ननगरी मुंईत येऊन तिला वर्षही झाले नाही तोवर तिने मुंबईत स्वत:चा एक भव्य फ्लॅटही घेतला. मुंबईत घर असावे हे स्वप्न काहींचे फक्त स्वप्नच राहते मात्र आज मोनालिसाकडे पैसा,फेम आणि प्रसिध्दी या दोन्ही गोष्टी आहेत.त्याच जोरावर मोनालिसा आर्थिक दृष्ट्याही सक्षम बनली आहे.अशा प्रकारे  मोनालिसा  नेडीझन्सना चर्चेसाठी चांगलाच टॉपिक मिळाला आहे. सध्या बिग बॉसच्या 11 व्या सिझनची जोरदार चर्चा सुरू आहे. घरात येणारे सेलिब्रेटींपासून ते अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. बिग बॉस या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमध्ये प्रेक्षकांना शेजारी शेजारी ही थिम पाहायला मिळणार आहे. यंदा बिग बॉसच्या घरातील मंडळी दोन घरात विभागली जाणार असून ते एकमेकांचे शेजारी-शेजारी असणार आहे. त्यामुळे याच विषयाला अनुसरून बिग बॉसचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान घराच्या समोर असलेल्या रोपट्यांना पाणी देत आहे. पण ते पाणी चक्क एका वयस्क माणसाच्या चहात पडते आणि तो चिडतो तर दुसरीकडे सलमान घरातील कपडे वाळत टाकत असताना लग्न कधी करणार, आता लग्न करूनच टाक असा सल्ला त्याची एक शेजारीण देते. हा प्रोमो खूपच इंटरेस्टिंग दिसत आहे. पण त्याचसोबत या प्रोमोचे मेकिंग देखील खूप रंजक आहे.बिग बॉसच्या या प्रोमोच्या चित्रीकरणाच्या वेळी सलमान खानने खूपच मजा मस्ती केली आहे. या प्रोमोच्या मेकिंगचा व्हिडिओ कलर्स या वाहिनीने त्यांच्या ट्विटर सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या व्हिओमध्ये चित्रीकरणाच्या वेळी सगळ्यांनी खूप मजा मस्ती केली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच या प्रोमो मेकिंगमध्ये सलमानने त्याच्या शेजाऱ्यांविषयी देखील माहिती दिली आहे. सलमान खानचे शेजारी कोण आहेत कसे आहेत हे जाणून घ्यायला त्याच्या फॅन्सना नक्कीच आवडणार यांत काही शंका नाही.

​Also Read: ऐका सलमान खान काय सांगतोय त्याच्या शेजाऱ्यांविषयी
Web Title: Bigg Boss 10: Monolitha gained popularity, now in Asia, Asia
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.