The Big Boss's EX-Contestant has to work in the film | बिग बॉसच्या या EX-कंटेस्टंटला सिनेमात काम मिळेना,करावे लागते हे काम

रिअॅलिटी शोमुळे पैसा, प्रसिद्धीसह रसिकांचे प्रेम आणि नवी ओळख स्पर्धकांना मिळते. रुपेरी पडद्यावर सिनेमात काम करण्याच्या अनेक संधी अशा रिअलिटी शोच्या  स्पर्धकांना मिळतात.मात्र याला हरियाणाची डान्सिंग क्वीन सपाना चौधरी अपवाद ठरली आहे.कारण,बिग बॉस सारख्या टीव्ही शोमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतरही तिला फारसे बॉलिवूडमध्ये काम मिळाले नाही.त्यामुळे आजही तिला स्टेज शो करण्यातच समाधान मानावे लागत आहे.नुकतेच सपना चौधरीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये सपना तिचे गाणे 'तेरी आंख्या का ये काजल...' वर परफॉर्म करताना दिसतेय. हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपुर्वीचा वाराणसीचा आहे.येथे सपना चौधरी, अर्शी खान, राखी सावंतने एकत्र डान्स केला होता.आपल्या ठुमक्यांनी सर्वांना घायाळ करणा-या सपनाने बॉलिवूडमध्ये एन्ट्रीही केली होती.‘वीरे की वेडिंग’ या सिनेमात सपना आयटम साँग करताना दिसणार आहे.मात्र तिला फारसे तसे बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे ती आजही वेगवगेळ्या ठिकाणी डान्स शो करते. 

हरियाणामध्ये सपना प्रचंड प्रसिद्ध असली तरी ती आजही स्वतःला एक सामान्य मुलगीच समजते.घरची परिस्थिती बेताची असल्याने एवढ्या लहान वयात तिला घरची जबाबदारी उचलावी लागली. त्यामुळेच ती गायन आणि नृत्याकडे वळली.या तिच्या डान्समुळे सपनाने तिच्या घरातल्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या.तिच्या बहिणीचे लग्न करून दिले.सपनाच्या सॉलिड बॉडी या पहिल्याच गाण्याने युट्युबला धुमाकूळ घातला होता.तिच्या पहिल्याच गाण्यामुळे ती फेमस झाली.आज तर तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. अनेक वेळा तर तिच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जदेखील करावा लागतो.कोणताही स्टेज शो म्हटला की,एक संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. पण सपनाच्या कार्यक्रमात ती एकटीच अनेक तास लोकांचे मनोरंजन करते आणि विशेष म्हणजे ती कधीही पंजाबी ड्रेसमध्येच परफॉर्म करते.याव्यतिरिक्त ती देशाच्या विविध भागांमध्ये शो करीत आहे. सपनाचे बरेचसे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. 
Web Title: The Big Boss's EX-Contestant has to work in the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.