Big Boss Marathi's competitor Silk Tipnis is doing the same to date | ​बिग बॉस मराठीची स्पर्धक रेशम टिपणीस या व्यक्तीला करतेय डेट
​बिग बॉस मराठीची स्पर्धक रेशम टिपणीस या व्यक्तीला करतेय डेट
बिग बॉस मराठीमध्ये रेशम टिपणीस सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात आल्यापासून रेशम चांगलीच वादात अडकली आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक राजेश शृंगारपूरे सोबत तिचे सूत जमले होते. एवढेच नव्हे तर हे दोघे या कार्यक्रमात एकमेकांसोबत वेळ घालवताना, एकाच बेडवर झोपताना पाहायला मिळाले होते. या सगळ्या गोष्टींमुळे बिग बॉस मराठी हा कार्यक्रम वादात अडकला होता. यानंतर काहीच दिवसांत राजेश शृंगारपूरेला घराच्या बाहेर पडावे लागले. 
रेशम अजूनही घरात असून तिने काही दिवसांपूर्वी या घरात संदेश हे नाव घेतले होते. ती संदेशला मिस करत आहे असे ती म्हणाली होती. तसेच स्पर्धकांचे कुटुंबिय नुकतेच बिग बॉसच्या घरात गेले होते. त्यावेळी संदेश तू का बिग बॉसच्या घरात मला भेटायला आला नाही असे रेशम कॅमेऱ्यासमोर बोलताना दिसली होती.
रेशमने संदेशचा या कार्यक्रमात दोनदा उल्लेख केल्यामुळे हा संदेश कोण आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. संदेशचे पूर्ण नाव संदेश किर्तीकर असून फेसबुकला रेशमच्या अनेक फोटोंना तो आवर्जून कमेंट करतो. संदेशने नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याच्या आणि रेशमच्या नात्यावर त्याने भाष्य केले आहे. रेशम आणि संदेश गेल्या अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. ते दोघे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून अडीज वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. रेशम बिग बॉस मराठीमध्ये खूप छान खेळत असून ती फायनलपर्यंत नक्कीच पोहोचेल अशी त्याला खात्री आहे. रेशम आणि त्याच्या नात्याला अनेक वर्षं झाली असली तरी त्या दोघांनी अद्याप लग्नाचा काहीही विचार केलेला नाहीये. 
राजेश आणि रेशमच्या नात्याविषयी संदेशला या मुलाखतीत विचारले असता तो सांगतो, तो केवळ एक गेम होता. रेशमला अशाप्रकारे वागायला सांगितले होते की नाही हे मला माहीत नाही. खरे सांगू तर सुरुवातीला रेशम आणि राजेशला एकत्र पाहून मला खूपच वाईट वाटले होते. पण इंडस्ट्रीतील काही मित्रांनी माझा संशय दूर केला. 

resham tipnis sandesh

Also Read : ​बिग बॉस मराठीची स्पर्धक मेघा धाडेच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का?
Web Title: Big Boss Marathi's competitor Silk Tipnis is doing the same to date
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.