In the Big Boss Marathi house, silk Tipnis and Rajesh Shringarpure are full-hearted love | ​बिग बॉस मराठीच्या घरात रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरेमध्ये फुलतेय प्रेम

बिग बॉस या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनमध्ये प्रेक्षकांना कोणते ना कोणते तरी कपल पाहायला मिळते. बिग बॉसच्या घरात असताना या जोडप्यांचे एकमेकांशिवाय पान देखील हलत नाही. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर ही जोडपी एकमेकांकडे पाहायला देखील तयार होत नाही. केवळ घरात असताना कार्यक्रमाचा टीआरपी वाढवण्यासाठी आणि कार्यक्रमात टिकून राहाण्यासाठी ही जोडपी प्रेमाचे नाटक करत असल्याचे दिसून येते. आता बिग बॉस मराठी मध्ये देखील दोन स्पर्धकांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलत आहे.
रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्यात मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी असल्याचे प्रेक्षकांना सध्या बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी एकमेकांना पसंत करत असल्याची कबुली देखील नुकतीच बिग बॉसच्या घरात दिली आहे. बिग बॉसच्या घरात रोज काही ना काही टास्क सुरू असतात. नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये रेशमने राजेशवर प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच बिग बॉसच्या घरात नुकताच चोर पोलिसचा खेळ रंगला होता. या खेळाच्या दरम्यान देखील रेशम टिपणीस राजेशला म्हणाली, आपण बिग बॉसच्या घरात दोघे काही विचित्र वागतोय असे मला तरी वाटत नाही, घरात कुणालाही आपल्या नात्याविषयी काय बोलायचे ते बोलू देत, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. रेशमने असे सांगताच राजेशने देखील लगेचच यावर उत्तर दिले. तो म्हणाला, मी देखील कुणाला घाबरत नाही. 
बिग बॉसच्या घरात राजेश आणि रेशमच्या नात्याविषयी चर्चा देखील सुरू झाली आहे. उषा नाडकर्णी, पुष्कर जोग, सई लोकूर, मेधा धाडे हे बिग बॉसच्या घरात असलेले इतर स्पर्धक त्यांच्या नात्याविषयी गॉसपिंग करायला लागले आहेत. 
बिग बॉसच्या घरात ते दोघे सतत एकत्र असतात. एवढेच नव्हे तर रात्री उशिरापर्यंत दोघे एकमेकांशी गप्पा मारत असतात. रात्री झोपायच्या आधी एकमेकांना ते गुडनाईट किस करताना देखील दिसतात. तसेच अनेक वेळा ते एकमेकांना अलिंगन करत असताना देखील बिग बॉसच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

Also Read : बिग बॉसच्या घरात असा साजरा झाला महाराष्ट्र दिन
Web Title: In the Big Boss Marathi house, silk Tipnis and Rajesh Shringarpure are full-hearted love
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.