Big Boss Marathi Fame Usha Nadkarni is in the quote, My greatest love is about this | ​बिग बॉस मराठी फेम उषा नाडकर्णी सांगतायेत, या गोष्टीवर आहे माझे सर्वाधिक प्रेम
​बिग बॉस मराठी फेम उषा नाडकर्णी सांगतायेत, या गोष्टीवर आहे माझे सर्वाधिक प्रेम
उषा नाडकर्णी सध्या आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळत आहेत. बिग बॉस मराठी पाहाणाऱ्यांना या कार्यक्रमात उषा नाडकर्णी प्रचंड आवडत असून या कार्यक्रमाच्या विजेतेपदाच्या त्या मजबूत दावेदार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. उषा नाडकर्णी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात आहेत. त्यांनी नाटक, सिनेमा, मालिका अशा सगळ्याच माध्यमांमध्ये काम केले आहे. एक कलाकार म्हणून त्यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्यांचे सर्वाधिक प्रेम कोणत्या गोष्टीवर आहे हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 
उषा नाडकर्णी गेल्या अनेक वर्षांपासून मोठा पडदा, छोटा पडदा आणि रंगमंच या तिन्ही माध्यमांमध्ये काम करत असून त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या आहेत. त्या मालिका, चित्रपटात काम करत असल्या तरी रंगमंचावर काम करण्याचा अनुभवच वेगळा असतो असे त्या सांगतात. रंगमंचावर त्यांचे सर्वाधिक प्रेम असून त्यांच्या आयुष्यात रंगमंचाला प्रचंड महत्त्व आहे. त्या सांगतात, नाटकात काम करण्याचा अनुभवच वेगळा असतो. नाटकात काम करताना प्रत्येक प्रयोगाला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने अभिनय करू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्यातील सर्वोत्तम देता येते. तसेच नाटकात काम करत असताना लोकांच्या प्रतिक्रिया या तुम्हाला लगेचच मिळतात. त्यामुळे त्यांना कोणती गोष्ट आवडते, कोणती नाही हे आपल्या लगेचच लक्षात येते. त्यामुळे एक कलाकार म्हणून आपल्याला अधिक समृद्ध होता येते. 
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीत देखील त्यांचे एक चांगले नाव कमावले आहे. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. माहेरची साडी, सिंहासन यांसारख्या अनेक मराठी चित्रपटातील तर वास्तव, वन टू थ्री, रुस्तम यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांनी साकारलेली खाष्ट सासू प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या करियरला एक वेगळेच वळण मिळाले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

Also Read : ​​बिग बॉस मराठीतील या स्पर्धकाला मिळते सगळ्यात जास्त मानधन
Web Title: Big Boss Marathi Fame Usha Nadkarni is in the quote, My greatest love is about this
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.