The big boss Marathi competitor Sharmishtha Raut has done a lot about her personal life | ​बिग बॉस मराठीची स्पर्धक शर्मिष्ठा राऊतने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी केला हा मोठा उलगडा

नुकतीच बिग बॉसच्या घरात शर्मिष्ठा राऊतची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे तर हर्षदा नुकतीच घरातून बाहेर गेली आहे. हर्षदा ही केवळ काही दिवसांसाठी पाहुणी म्हणून घरात गेली होती. हर्षदाच्या जाण्याने स्पर्धकांना प्रचंड वाईट वाटले असले तरी शर्मिष्ठाच्या येण्याने सगळ्यांना आनंद झाला आहे. शर्मिष्ठा राऊतने मन उधाण वाऱ्याचे या मालिकेत साकारलेली नीरजाची भूमिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत ती एका नकारात्मक भूमिकेत दिसली असली तरी प्रेक्षकांनी तिची भूमिका डोक्यावर घेतली होती. त्यानंतर ती उंच माझा झोका, जुळून येती रेशीमगाठी यांसारख्या मालिकेत झळकली. तिने योद्धा, नवरा माझा भोवरा यांसारख्या चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. जो भी होगा देखा जायेगा हे तिने शेखर फडकेसोबत नाटक देखील केले होते. या नाटकात तिचा कॉमिक सेन्स प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. शर्मिष्ठाने गेल्या काही वर्षांत छोट्या पडद्यावर आपली एक ओळख निर्माण केली आहे. 
कोणताही कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी न बोलणेच पसंत करतो. पण शर्मिष्ठाने बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झाल्या झाल्या तिच्या आयुष्यातील एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीविषयी सगळ्यांना सांगितले. शर्मिष्ठा बिग बॉस मराठीच्या घरात नुकतीच दाखल झाली असून सगळ्या स्पर्धकांसोबत ती चांगलीच रुळत आहे. सई लोकरू, आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी आणि मेघा धाडे यांच्याशी बिग बॉसच्या घरात गप्पा मारताना शर्मिष्ठाने तिच्या खाजगी आयुष्याविषयी एक गोष्ट सगळ्यांना सांगितली. शर्मिष्ठाचा याचवर्षी जानेवारी महिन्यात घटस्फोट झाला असल्याचे तिने या तिघींना सांगितले. शर्मिष्ठाच्या लग्नाला जवळजवळ नऊ ते दहा वर्षं झाली होती. शर्मिष्ठाचे लव्ह मॅरेज असून तिचे लग्न अमेय निपाणकरसोबत झाले होते. शर्मिष्ठा आणि अमेयचे लव्ह मॅरेज असले तरी त्यांच्या दोघांच्याही कुटुंबियांच्या संमतीने त्यांनी लग्न केले होते. पण आयुष्यात काही निर्णय चुकतात असे शर्मिष्ठाने आऊ, मेघा आणि सई यांना सांगितले. तसेच ती गेल्या कित्येक महिन्यांपासून मानसिक तणावातून जात असून केवळ आई वडिलांनी दिलेल्या आधारामुळे आज आयुष्य जगत असल्याचे सांगितले. 

Also Read : रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्या नात्याबाबत अखेर त्याच्या पत्नीने सोडले मौन...
Web Title: The big boss Marathi competitor Sharmishtha Raut has done a lot about her personal life
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.