Big Boss Marathi : या अभिनेत्रीची आहे अस्ताद काळेच्या आयुष्यात खास जागा; स्वत:च दिली कबुली!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 10:08 PM2018-07-18T22:08:24+5:302018-07-19T08:21:34+5:30

अस्ताद काळेने गेल्या काही वर्षात छोट्या पडद्यावर त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने त्याच्या आयुष्यात असलेल्या खास व्यक्तीचे नाव घेतले.

Big Boss Marathi: This actress's has special place in the life of Aastad Kale | Big Boss Marathi : या अभिनेत्रीची आहे अस्ताद काळेच्या आयुष्यात खास जागा; स्वत:च दिली कबुली!

Big Boss Marathi : या अभिनेत्रीची आहे अस्ताद काळेच्या आयुष्यात खास जागा; स्वत:च दिली कबुली!

googlenewsNext

बिग बॉस या रिऍलिटी शोची सध्या चांगलीच चर्चा आहे. अस्ताद काळे आणि पुष्कर जोगने या कार्यक्रमाच्या फायनल पर्यंत धडक मारली आहे. आता या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाच्या घरात नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. 

शर्मिष्ठा राऊत, सई लोकूर, पुष्कर जोग, मेधा घाडे, अस्ताद काळे आणि स्मिता गोंदकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना भरभरून उत्तरे दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ही सगळी मंडळी या घरात असल्याने त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नाहीये. त्यामुळे सगळ्या पत्रकारांना भेटून स्पर्धकांना खूप आनंद झाला होता. एवढया दिवसांनी इतके लोक पाहायला मिळाले, त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या अशाच सगळ्या स्पर्धकांच्या प्रतिक्रिया होत्या. 

अस्ताद काळेने गेल्या काही वर्षात छोट्या पडद्यावर त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. अस्ताद गेली अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात आहे. पण त्याच्या खाजगी आयुष्याविषयी तो बोलणे टाळतो. पण बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने त्याच्या आयुष्यात असलेल्या खास व्यक्तीचे नाव घेतले. ही खास व्यक्ती म्हणजे अभिनेत्री स्वप्नाली पाटील असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर तुला सगळ्यात पहिल्यांदा कोणाला भेटायचे आहे असे विचारले असता अस्ताद सांगतो, घरातून बाहेर पडल्यावर मला माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला म्हणजेच अभिनेत्री स्वप्नाली पाटीलला भेटायचे आहे. मी मुंबईत राहत असलो तरी माझे आई वडील पुण्याला राहतात. माझी मुंबईच्या घराची किल्ली, माझे डेबिट कार्ड सगळे काही माझ्या पुण्याच्या घरी आहेत. त्यामुळे फिनले नंतर तो पुण्याला जाणार आहे. मी तिथे स्वप्नालीला नक्कीच बोलवून घेईन.

पुढचे पाऊल या मालिकेत अस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी एकत्र काम केले होते. ते दोघे कित्येक महिन्यापासून नात्यात असल्याचे म्हटले जाते. बिग बॉसच्या घरात असतानाच अस्तादने त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीचा उल्लेख केला असल्याने त्याच्या फॅन्सना त्याच्या आयुष्यात कोणी तरी असल्याचे कळले होते.

 

Web Title: Big Boss Marathi: This actress's has special place in the life of Aastad Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.