Big Boss crosses the threshold of simplicity Jyoti Kumari gets cigarette! | ‘बिग बॉस’चा उंबरठा ओलांडताच साधीभोळी ज्योती कुमारी गेली सिगारेटच्या आहारी!

‘बिग बॉस’ या सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोच्या सीजन ११ ची सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी घरातील सदस्यांनी त्यांचे रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. यावेळेसदेखील कॉमनर, सेलिब्रिटी आणि पडोसींना घरात प्रवेश देण्यात आल्याने सीजन १० प्रमाणेच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक रंगत येण्याची शक्यता आहे. कारण पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीने सेलिब्रिटी आणि कॉमनरमध्ये विसंवाद बघावयास मिळाला त्यावरून हा सीजन सर्वाधिक वादग्रस्त ठरेल असेच काहीसे चित्र आहे. शिवाय दर मिनिटाला काही ना काही ट्विस्ट शोमध्ये बघावयास मिळत असल्याने, एक तरी सदस्य चर्चेत राहत आहे. यावेळेस बिहारमधील एका छोट्याशा गावातून आलेली ज्योती कुमारी चर्चेत आली आहे. अर्थात ती सकारात्मक कारणामुळे नव्हे तर नकारात्मक कारणामुळे चर्चेत आली आहे. 

होय, बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये स्मोकिंग एरियात ज्योती सिगारेट ओढताना दिसत आहे. ज्योतीबरोबर या व्हिडीओमध्ये आणखीनही दोन सदस्य दिसत आहेत. घरात स्मोक करणाºयांना एक स्पेस देण्यात आला आहे. ज्यामध्ये एकावेळेस एकच व्यक्ती स्मोक करू शकतो. मात्र ज्योतीसह आर्शी खान आणि शिल्पा शिंदे या तिघींनी स्मोक करीत घरातील नियमाचे उल्लंघन केले आहे. खरं तर घरातील नियमांचे उल्लंघन होतच राहणार आहे. परंतु प्रश्न हा निर्माण होत आहे की, एका छोट्याशा गावातून आलेली अन् साधीभोळी दिसणारी ज्योती बिग बॉसचा उंबरठा ओलांडताच सिगारेटच्या मोहात पडल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला नसेल तरच नवल. 
 

१ आॅक्टोबर रोजी सुरू झालेल्या ‘बिग बॉस’मध्ये कॉमनर्सबरोबर सेलिब्रिटींनाही घरात प्रवेश देण्यात आला. त्याचबरोबर शोमध्ये ट्विस्ट निर्माण करण्यासाठी यावेळेस ‘पडोसी’ घरात आहेत. शिवाय त्यांना बिग बॉसने विशेषाधिकारही दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात शोमध्ये चांगलीच रंगत येईल, यात शंका नाही. 
Web Title: Big Boss crosses the threshold of simplicity Jyoti Kumari gets cigarette!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.