बिग बॉस स्पर्धक नेहा पेंडसेची पहिली कमाई होती अवघी इतकी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 01:38 PM2018-09-18T13:38:09+5:302018-09-19T08:00:00+5:30

नेहा गेल्या अनेक वर्षांपासून मालिका, चित्रपटांमध्ये काम करत आहे. नेहाच्या घरातील कोणीच चित्रपटसृष्टीशी संबंधित नाही. पण तरीही तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले आहे.

Big Boss contestant Neha Pendseau's first earning was just about Rs | बिग बॉस स्पर्धक नेहा पेंडसेची पहिली कमाई होती अवघी इतकी रुपये

बिग बॉस स्पर्धक नेहा पेंडसेची पहिली कमाई होती अवघी इतकी रुपये

googlenewsNext

नेहा पेंडसे सध्या बिग बॉसच्या घरात आपल्याला पाहायला मिळत आहे. नेहाने मराठी, दाक्षिणात्य, हिंदी अशा तिन्ही इंडस्ट्रीमध्ये अभिनयाने आपला ठसा निर्माण केला आहे. नेहाने राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या स्त्री या चित्रपटातील मिलेगी मिलेगी या गाण्यावर नृत्य करत बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री मारली. एवढेच नव्हे तर स्टेजवर ती सलमानसोबत फ्लर्ट करताना दिसली. नेहा सलमानला म्हणाली, तुम्ही माझे शेजारी असता तर लाईफ बनली असती. नेहाच्या या धुवाँधार एंट्रीमुळे नेहा बिग बॉसच्या घरात गेल्यापासूनच चर्चेत आहे. 

नेहा गेल्या अनेक वर्षांपासून मालिका, चित्रपटांमध्ये काम करत आहे. नेहाच्या घरातील कोणीच चित्रपटसृष्टीशी संबंधित नाही. पण तरीही तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले आहे. नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती एका मध्यवर्गीय कुटुंबातील आहे, तिचे वडील हे बिझनेसमन असून आई ही गृहिणी आहे. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता. केवळ १० वर्षांची असताना तिने सगळ्यात पहिल्यांदा कॅमेराला फेस केले होते. त्यावेळी तिला त्या कामाचे ५०० रुपये मिळाले होते. हे पैसे तिने तिच्या पालकांना दिले होते. तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम केले आहे. 

नाना पाटेकर यांच्या नटसम्राट या चित्रपट तिची महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटानंतर तिचा मराठी चित्रपट कोणता येणार याची तिचे फॅन्स वाट पाहात आहेत. तिने गेल्या काही वर्षांत मे आय कम इन मॅडम, पाटर्नस यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात देखील ती दिसली होती. 
अभिनयक्षेत्रात करियर करणे नेहासाठी सोपे नव्हते. अभिनयक्षेत्रात कोणीही गॉडफादर नसल्याने तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. काम मिळवून देण्यासाठी तिच्याकडे अनेकांनी शरीरसुखाची मागणी देखील केली होती. पण तिने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला होता असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.  
 

Web Title: Big Boss contestant Neha Pendseau's first earning was just about Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.