Big Boss Contender Jubair Khan is telling, Salman Khan is Dawood's spoon | ​बिग बॉस स्पर्धक जुबैर खान सांगतोय, सलमान खान आहे दाऊदचा चमचा

जुबैर खान बिग बॉसच्या घरात सपर्धक म्हणून आपल्याला पाहिला मिळाला होता. पण पहिल्याच आठवड्यात तो सगळ्यात वादग्रस्त स्पर्धक बनला. त्याने पहिल्याच आठवड्यात घरातील सगळ्यांशी पंगा घेतला. तो घरातील सगळ्यांशी अतिशय असभ्य शब्दांत बोलत असे. या त्याच्या वागणुकीमुळे या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमान खानने त्याला चांगलेच सुनावले होते. सलमानने जुबैरचा चांगलाच क्लास घेतला होता. पण हा क्लास सलमानच्या अंगाशी आला आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
सलमान शनिवारच्या भागात जुबैरला म्हणाला होता की, ‘जब तुम यहाँ आए थे तो तुम्हारी कोई औकात वैसे ही नहीं थी. यह किसी का दामाद नहीं है. जिस परिवार से यह अपना नाम जोड़ता है इसका उससे कोई लेना-देना नहीं है. अपनी औकात दिखानी है न तो निकाल गंदगी मेरे सामने. जुबैर यहां अपनी इमेज बनाने आया है या इमेज डुबाने आया है.’ सलमानचे हे शब्द जुबैरच्या चांगलेच जिव्हारी लागले असल्याने त्याने गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले होते. आता त्याची तब्येत सुधारत आहे.
या प्रकरणानंतर जुबैरने सलमानला अनेक धमक्या दिल्या आहेत. मी काही तुला घाबरायला विवेक ऑबेरॉय नाही असे त्याने सलमानला म्हटले होते. तसेच त्याच्या आत्महत्येचे प्रकरण दाबले जात असल्याचे त्याचे म्हणणे आहे. कोणीही आत्महत्येचा प्रयत्न केल्यास त्याला सरकारी रुग्णालयात नेण्यात येते. पण जुबैरला एका प्रायव्हेट रुग्णालयात का नेण्यात आले असा त्याने प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच या सगळ्या प्रकरणात जुबैरने सलमानच्या बाबतीत आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, सलमान हा दाऊदचा चमचा आहे.
एवढेच नव्ह तर सलमानवर केस दाखल केल्यापासून त्याला अनेक धमकीचे फोन येत आहेत. केस मागे घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जात असल्याचे देखील त्याने म्हटले आहे. 

Also Read : सलमान खानच्या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार वरुण धवन
Web Title: Big Boss Contender Jubair Khan is telling, Salman Khan is Dawood's spoon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.