Big Boss 11: The reality show 'Bigg Boss' is not scripted ...! | Big Boss 11 : ‘बिग बॉस’ हा रिअ‍ॅलिटी शो स्क्रीप्टेड नाहीच...!

-रवींद्र मोरे 
दिल्ली येथील प्रियांक शर्मा बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. विशेष म्हणजे पहिल्याच विकेंडमध्ये आपल्या एका सहकाऱ्यावर हात उचलल्यामुळे प्रियांक शर्माला सलमान खानने घरातून बाहेर केले होते. अजून बरेच किस्से या रिअ‍ॅलिटी शोमध्ये घडलेले आहेत आणि यापुढेदेखील घडणार आहेत, त्याविषयी अधिक माहित जाणून घेण्यासाठी प्रियांक शर्माशी मारलेल्या गप्पा...

* या शोमध्ये सर्वाच चागंले कोण खेळत आहे?
- विशेषत: सर्वच स्पर्धक अगदी चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. अजून मात्र या शोची सुरुवातच असल्याने व्यक्तिगत कोण चांगले खेळत आहे, हे सांगणे कठीण आहे. काही काळानंतर समजेलच की कोण चांगले खेळत आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने चांगले खेळण्याचा प्रयत्न करीत आहे. 

* जुबेर खानने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, याबाबत तु काय सांगशील?
-माफ करा, याबाबत मला काहीच माहित नाही. मी बाहेर गावाला होतो. त्यामुळे मी याबाबत काहीच सांगु शकत नाही. पण जुबेर खान हा काहीअंशी डिस्टर्ब वाटत होता, एवढेच सांगू शकतो. 

* सलमान खान सर्वांवर चिडला होता, असे ऐकण्यात आले, हे खरे आहे का?
बिग बॉसच्या घरात सर्वजण आपल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करीत असतात, त्यामुळे एकमेकांशी वाद होणे साहजिकच आहे. शिवाय जास्तच वाद झाला तर जबाबदारीच्या नात्याने सलमान खान चिडणारच. 

* हा शो स्क्रीप्टेड असल्याचे बोलले जात आहे, याबाबत काय सांगशील?
- हे स्पष्ट चुकीचे आहे. यात कोणत्याही प्रकारची अ‍ॅक्ट ही स्क्रीप्टेड किंवा पुर्वनियोजित नसून आम्ही सर्वजण आमच्या मर्जीने सर्व कामे करतो. जसे आपण स्वत:च्या घरात वावरतो, सर्व कामे करतो. त्याचपद्धतीने याठिकाणीदेखील करत असतो. स्वत:चा स्वयंपाकही आम्ही स्वत:च तयार करत असतो. एकंदरीत प्रत्येकजण स्वत:ची कामे स्वत:च करत असल्याने हा शो स्क्रीप्टेड म्हणणे चुकीचे ठरणार आहे.  
Web Title: Big Boss 11: The reality show 'Bigg Boss' is not scripted ...!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.