Big Boss 11: Dhinkach Pooja says Big Bang's house will explode! | Big Boss 11 : ढिंचॅक पूजा म्हणतेय, बिग बॉसच्या घरात करणार धमाका!

आपल्या विचित्र गायिकीने सोशल मीडियावर धूम उडवून देणाºया ढिंचॅक पूजाने बिग बॉसच्या घरात नुकतीच वाइल्ड कार्ड एंट्री केली आहे. मात्र घरात प्रवेश करण्याअगोदरच तिने एल्गार पुकारला असून, घरात धमाका करण्याच्या निर्धाराने प्रवेश करीत असल्याचे म्हटले आहे. याकरिता पूजाने बिग बॉसचे काही एपिसोड बघितले असून, त्यात तिचा कोणाशी सामना होऊ शकतो याचाही तिने अंदाज घेतला आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याअगोदर पूजाशी संवाद साधला असता, तिने तिचा प्लॅन सांगताना ‘आगे आगे देखो होता है क्या?’ असेच जणूकाही संकेत दिले आहेत. 

प्रश्न : वाइल्ड कार्ड एंट्री करीत असल्याने तू घरातील वातावरण जाणून आहेस, अशात तू काही प्लॅन केला आहेस काय?
- नाही, मी गेल्या काही दिवसांमधील एपिसोड बघितले आहेत. त्यामुळे घरात कोण कोण आहे, याची तोंडओळख झाली आहे. सध्या घरात बºयाचशा घडामोडी घडत आहेत. अशात घरात जाऊन धमाका करण्याचा माझा विचार आहे. वास्तविक याकरिता मी काहीही प्लॅन केला नाही. परंतु परिस्थितीनुसार स्वत:मध्ये मी बदल करणार आहे. हिना खान, शिल्पा, राहुल, ज्योती, रॅपर आकाश ददलानी यांच्याविषयी ऐकून असल्याने त्यांच्याशी माझी गट्टी जमेल, असे म्हणायला हरकत नाही. 

प्रश्न : बिग बॉसच्या घरात रॅपर आकाश ददलानी हादेखील आहे, अशात त्याच्याशी तुझी गट्टी जमेल असे तुला वाटते काय?
- होय, आकाश खूप चांगला मनुष्य आहे. त्यामुळे त्याच्यासोबत माझी गट्टी जमेल असे म्हणायला हरकत नाही. वास्तविक मी घरात कोणाबरोबरच वाद घालणार नाही, तर सगळ्यांशीच मैत्री करणार आहे. आकाशबरोबर एखादे गाणे करता आले तर मी नक्कीच त्याबाबतचा विचार करेल. खरं तर मी काही गाणी तयार केली असून, बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर ती मी गाणार आहे. त्यात आकाशची मदत मिळाल्यास मला आनंदच होईल. 

प्रश्न : तू सलमान खानची चाहती आहेस, अशात त्याला भेटण्यास कितपत उत्सुक आहेस?
- सलमान खानची मी खूप मोठी चाहती आहे. त्यामुळे त्याची भेट झाल्यास बिग बॉसच्या घरात आल्याचे सार्थकी लागेल असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. खरं तर मी सलमान खानला भेटणार या विचारानेच हरकून गेली आहे. मी सलमानचा एकही चित्रपट बघायला विसरत नाही. त्यामुळे या घरात आल्यानंतर सलमान खानची भेट झाल्यास तो माझ्यासाठी मोठा क्षण असेल. सध्या मला त्याच्या भेटीची ओढ लागली आहे. 

प्रश्न : तू काही एपिसोड बघितले आहेत, अशात तुझा कोणाशी पंगा अन् कोणाशी मैत्री होईल, असे तुला वाटते?
- खरं तर मला कोणाशीच पंगा घ्यायचा नाही. मी घरात सगळ्यांबरोबर मैत्री करणार आहे. मला असे वाटते की, घरात म्हणावे तेवढे वातावरण गंभीर नाही. त्यामुळे प्रत्येकाबरोबर मिळूनमिसळून राहण्यास मदत होईल. याशिवाय मला कोणाबरोबरही स्पर्धा करायची नाही. हा एक गेम असून, परिस्थितीनुसार मी तो खेळणार आहे. मात्र या संपूर्ण प्रवासात मी कोणाबरोबरही वाद घालणार नाही. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा मी माझ्या गाण्यांनी सगळ्यांचीच मने जिंकणार.
Web Title: Big Boss 11: Dhinkach Pooja says Big Bang's house will explode!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.