Bharat Ganeshpuro will get married for the second time, in marriage, will be married to him | ​भारत गणेशपुरे दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात, हिच्यासोबत करणार लग्न

भारत गणेशपुरे हे नाव चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचले. भारत गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटांमध्ये काम करत आहे. त्याने सातच्या आत घरात, आई थप्पथ, एक डाव धोबी पछाड यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. फू बाई फू या कार्यक्रमात प्रेक्षकांना त्याच्यातील विनोदवीर दिसून आला. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने तर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. भारत गणेशपुरेच्या चाहत्यांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. भारत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
भारत लग्नबंधनात अडकणार हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. एवढेच नव्हे तर भारतने आजवर लग्न केलेच नव्हते का असा प्रश्न देखील पडला असेल. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत... भारतचे लग्न होऊन १८ वर्षं झाली आहेत. आता १८ वर्षांनंतर तो पुन्हा एकदा लग्न करत आहे. आता तो कोणाशी लग्न करत आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर या प्रश्नाचे उत्तर असे की, तो त्याच्या पत्नीसोबतच पुन्हा लग्न करत आहे.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात भारतसोबत काम करणाऱ्या श्रेया बुगडेने ही गोष्ट इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितली आहे. श्रेयाने भारत आणि त्याच्या पत्नीच्या हळदी समारंभातील एक फोटो सोशल नेटवर्किंगला पोस्ट करून भारत दादा आणि वहिनीची हळद अशी त्याला कॅप्शन दिली आहे.
भारतने त्याच्या पत्नीसमवेत पुन्हा लग्न करण्यामागे एक खास कारण आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची टीम काही दिवसांपूर्वी वर्ल्ड टूरवर गेली होती. त्यावेळी भारतला सौम्य अटॅक आला होता. भारतचा ज्योतिष शास्त्रावर खूप विश्वास आहे. त्यामुळे त्याने भारतात आल्यावर लगेचच ज्योतिषींची भेट घेतली होती. त्यावर ज्योतिषींनीच त्याला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच आज तो हिंदू रितीरिवाजांनुसार पुन्हा एकदा पत्नीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 

Also Read : रसिकांना हसवण्यासाठी 'चला हवा येऊ द्या'चे कलाकार घेतात इतकी मेहनत
Web Title: Bharat Ganeshpuro will get married for the second time, in marriage, will be married to him
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.