Because the breath was ever too many, the members of this series died | ​क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेतील या सदस्याचे झाले निधन

क्योंकी साँस भी कभी बहू थी ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या मालिकेने अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विराणी कुटुंबाच्या अनेक पिढ्या आपल्याला या मालिकेत पाहायला मिळाल्या. ही मालिका संपून आज इतके वर्षं झाले असले तरी या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या तितकेच लक्षात आहेत. या मालिकेचे अनेक वर्षं चित्रीकरण सुरू असल्याने या मालिकेतील सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे एक वेगळे कुटुंब बनले होते. आजही या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ वेळात वेळ काढून एकमेकांना भेटतात. काही दिवसांपूर्वी या मालिकेत तुलसीची भूमिका साकारणारी स्मृती इराणी आणि या मालिकेची निर्माती एकता कपूर यांची देखील भेट झाली होती. त्यांच्या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर देखील पोस्ट केले होते. 
क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेच्या टीमला मधील एका सदस्याचे नुकतेच निधन झाले आहे. या मालिकेत तलत जानी यांनी सहदिग्दर्शकाची कामगिरी बजावली होती. त्यांनी क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेसोबतच आजवर अनेक प्रसिद्ध मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेचा ते अनेक वर्षं भाग असल्याने या मालिकेच्या टीमसोबत त्यांचे नाते खूपच चांगले होते. तलत ६ ऑक्टोबरला त्यांच्या बाथरूममध्ये पाय घसरून पडले होते. त्यानंतर त्यांना वसई येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाथरूममध्ये पडल्यामुळे त्यांना चांगलीच दुखापत झाली होती आणि त्या अवस्थेत त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. 

talat jani

अभिनेता तुषार कपूरने ट्वीट करून तलत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तलत जानी हे केवळ असे एकच व्यक्ती होते, ज्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात बाबा आणि मी दोघांनीही काम केले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. 

  तलत जानी यांनी हिना, ख्वाईश, तुझ संग प्रीत लगाई सजना, सन्नाटा, ताकत, जीना सिर्फ मेरे लिये अशा अनेक मालिकांचे आणि अनेक चित्रपटांचे देखील त्यांनी दिग्दर्शन केले आहे. 

Also Read : तुम्हाला माहीत आहे का बिग बॉस ११चा स्पर्धक हितेन तेजवानीचे गौरी प्रधानसोबत आहे दुसरे लग्न
Web Title: Because the breath was ever too many, the members of this series died
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.