Barkha Bicht Partners will appear in this series or in the role | ​बरखा बिष्ट पार्टनर्स या मालिकेत दिसणार या भूमिकेत

सब टिव्ही वाहिनीवर प्रेक्षकांना पार्टनर्स ही मालिका पाहायला मिळत असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. या मालिकेत जॉनी लिव्हर, असरानी, किकू शारदा, विपुल रॉय, किश्वर मर्चंट, श्वेता गुलाटी आणि अश्विनी कळसेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेला तगडी स्टार कास्ट लाभली आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता छोट्या पडद्यावरच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.
अभिनेत्री बरखा बिष्टने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्यार के दो नाम... एक राधा एक श्याम, काव्यांजली, कसौटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमधील बरखाच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. नामकरण या मालिकेतील तिची आशा ही भूमिका तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. तिने ही मालिका सोडल्यापासून प्रेक्षक तिला प्रचंड मिस करत आहेत. आता ती नामकरण या मालिकेत परतणार असल्याची चर्चा आहे. त्याचसोबत ती प्रेक्षकांना एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पार्टनर्स या मालिकेत बरखाची लवकरच एंट्री होणार असून या मालिकेत ती एका अभिनेत्रीच्याच भूमिकेत दिसणार आहे.
पार्टनर्स या मालिकेत लवकरच काही नवीन कलाकारांना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत बरखा शिखा या अभिनेत्रीची व्यक्तिरेखा साकारणार असून मनोज गोयल निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. बरखा आणि मनोज यांनी मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून लवकरच ते मालिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. मनोजने एक चाबी है पडोस में, सजन रे झुठ मत बोलो यांसारख्या मालिकांमध्ये तर कंपनी, ब्लॅक फ्रायडे, बंटी और बबली यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या आजवरच्या अनेक भूमिकांचे कौतुक झाले आहे. बरखाचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : ​नामकरणमध्ये बरखा बिष्ट पुनरागमन करणार?
Web Title: Barkha Bicht Partners will appear in this series or in the role
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.