ेचित्रपटाचं चित्रीकरण म्हटंल की कानावर आवाज पडतो तो लाईट,कॅमेरा,अ‍ॅकशन आणि डोळÞयासमोर उभे राहते ते चित्रपटातील हिरो-हिरोईन, मोठ-मोठया लाईट, कॅमेरे आणि आकर्षक रंगी-बेरंगी सेटस्. त्यामध्ये कुडाच्या झोपडया ते मोठ-मोठे बंगले, जुन्या काळात चालणारे वाफे  वरील रेल्वे इंजिन, टांगा अशा प्रकारच्या कित्येक वास्तु आ़णि साहित्य. परंतु प्रत्यक्षात सिनेमा पडदयावर आल्यावर आपणाला फकत हिरो-हिरोईन दिसतात त्याच्या मागे असणारे तंत्रज्ञ, कला दिग्दर्शक, संगीतकार यांच्या बाबत फार कमी जणांना माहीती असते. अशाच एका पडदयामागे राहुन आपल्या हाताने उत्तमोत्तम सेट उभे करणाºया क लाकाराशी सिएनकसने साधलेला संवाद

                                   
      अहमदनगर जिल्हयातील हिवरा पिंपरखेड गावचा एक तरूण ज्याचे नाव बबन अडागळे. याचा अचंबीत करणारा प्रवास ऐकुनचं थकक होण्याची वेळ येते. बºयाच कलाकारांचा प्रवास हा मराठीतुन हिंदीकडे झाल्याचे आपण पहातो परंतु याची  कहाणी मात्र जरा वेगळी आहे. या पट्टयाचा प्रवास सुरू झाला तो हिंदीतील चंद्रकांता या मालिके  पासुन. त्यानंतर मात्र त्याने कधी मागे वळून पाहीलेच नाही. शागीर्द, मुंबई कटींग, रांजना, ग्रॅन्ड मस्ती, रावडी राठोड, वॉन्टेड, कयामात :सीटी अन्डर थ्रिट सारख्या चित्रपटांना साहयक कलादिग्दर्शकाच काम त्याने केल.

                                   
 तर दबंग, गोलीयोंकी रासलीला रामलीला, व्हीकटरी या सिनेमांच्या सेट डिजाईनच काम त्याने स्व:ता केल.नुकताचं तो मराठी चित्रपट एक आलबेलाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट आभिनेते भगवान दादांच्या जिवनावर बेतला असल्यामुळे पुर्वीच्या काळी वापरात असलेल्या घटकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.अनेक वेळा गोरेगावच्या फिल्म सीटी मध्ये  शुटींगच्या निमित्ताने असणाºया विदया बालनने जेव्हा एक आलबेला चित्रपटाचा सेट पाहिला तेव्हा ती त्या सेटच्या प्रेमात पडली व चित्रपटाच्या कलादिग्दर्शक ाला भेटण्याची इच्छा  व्यकत केली परंतु बाकीच्या सीन साठी सेट तयार करण्यात गुंतलेल्या बबन आडागळयांची तिला लागोपाठ तीन दिवस  भेट होऊ शकली नाही चौथ्यादिवशी त्यांची भेट झाली तेव्हा तीने शुटींग थांबवुन त्यांची भेट घेतली. शुटिंग संपताच तिन्हे त्यांना बोलावले व एक छान गिफट दिले तसेच त्यांच्या हातुन अशाच उत्तोमत्तम कलाकृती घडो अशा शुभेच्छा देखील दिल्या. अशा या आवलीयाला कलादिर्ग्शना बरोबरचं,बासरी वाजवणे,कथा लेखन, संगीत दिग्दर्शनाची देखील आवड आहे. संगीतबद्ध केलेला कोती हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

                                   
Web Title: Baban Adagale, one of the best-performing artists
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.