Ayushmann Khurana becomes coach, Know about it | आयुषमान खुराणा बनणार प्रशिक्षक, जाणून घ्या याबद्दल
आयुषमान खुराणा बनणार प्रशिक्षक, जाणून घ्या याबद्दल

ठळक मुद्देआयुषमान खुराणा दिसणार 'दि व्हॉईस' शोमध्ये


अभिनेता आयुषमान खुरानाने बॉलिवूडमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता म्हणे तो छोट्या पडद्यावर दिसणार असल्याचे समजते आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला शो ‘दि व्हॉईस’ आता केवळ स्टार प्लसवर भारतात दाखल होत असून यात देशातील अल्टिमेट व्हॉईसचा शोध घेण्यात येणार आहे. स्टार प्लसवरील सर्वांत मोठा सिंगिंग रिॲलिटी शो ‘दि व्हॉईस’ची मोठी चर्चा होत असून बॉलिवूडमधील हुशार अभिनेता आणि गायक आयुषमान खुराणाला ह्या शोमधील कोच बनण्यासाठी विचारण्यात आले आहे.


जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला उत्कृष्ट गायकांचा शो आणि चार एमी पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील 180 देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले आहे. आता भारतातही केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर या कार्यक्रमाचे लवकरच प्रसारण केले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, “आयुषमान खुराणाने आपल्या अफलातून आवाजाने लाखोंचे मन जिंकले असून तो ह्या शोसाठी सुयोग्य कोच असेल. आयुषमानचे केवळ त्याच्या अभिनय कौशल्यासाठी नव्हे तर गायनासाठीचेही अगणित चाहते आहेत. निर्मात्यांनी त्याला ह्या शोसाठी कोच म्हणून विचारले आहे. स्पर्धकांना उत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी तो स्पर्धकांना निश्चित मार्गदर्शन करेल.”


जर आयुषमान खुराणा स्टार प्लस वाहिनीवरील ‘दि व्हॉईस’मध्ये कोच म्हणून आला तर त्याच्या यशाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाईल. हा शो आपला रोचक फॉर्मेट आणि सेलेब्रिटी कोचेसच्या मोठ्‌या यादीसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 

 


Web Title: Ayushmann Khurana becomes coach, Know about it
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.