Ashnoor and Paridhi from Patiala Babes are diet partners | पटियाला बेब्स फेम परिधी शर्मा देतेय अशनूर कौरला या गोष्टींबद्दल सल्ला
पटियाला बेब्स फेम परिधी शर्मा देतेय अशनूर कौरला या गोष्टींबद्दल सल्ला

ठळक मुद्देपरिधी दीदी निराेगी जीवनशैलीसाठी नेहमीच पौष्टीक आहार खाण्यावर भर देते. अनिरुद्ध भैय्या आणि ती यासंदर्भातील टीप्स एकमेकांना शेअर करतात. आपण अनुसरलेली जीवनशैली याेग्य आहे की नाही हे देखील तपासत असतात.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पटियाला बेब्स ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असली तरी ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत असून या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाचे प्रेक्षक कौतुक करत आहेत. या मालिकेला नुकतेच एक रोचक वळण मिळाले आहे. आता परिधी शर्मा अभिनित बबिता तिच्या आयुष्यातील एका नवीन वळणावर येऊन पोचली आहे. तिचा तिच्या नवऱ्याशी घटस्फोट झाला आहे. या मालिकेतील आई आणि मुलगी दोघीही स्वयंपूर्ण होऊन आपल्या आपल्या जीवनाचा मार्ग शोधत आहेत. या कार्यक्रमात एक आई आणि तिच्या मुलीमधील नात्याचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. या मालिकेत परिधी शर्मा आणि अशनूर कौर या आई-मुलीच्या भूमिकेत आहेत. त्या दोघांची या मालिकेतील केमिस्ट्री खूपच छान आहे. आता खऱ्या आयुष्यात देखील त्या दोघींची चांगलीच गट्टी जमली आहे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात निराेगी जीवनशैलीसाठी सर्वच व्यक्तींकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. कलाकारही आता त्यासाठी जागरुक आहेत. अशनूर काैर फक्त १५ वर्षांची असली तरी तिने सदृढ आराेग्यसाठी पावले उचलली आहेत. परिधी नेहमी पौष्टीक आहारच घेते. निराेगी जीवनशैली जगण्याचा तिचा प्रयत्न असताे. आता तिच्यासोबच अनशूरदेखील केवळ पौष्टीक आहारच घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्या दोघींना चित्रीकरणाच्या दरम्यान मिळणाऱ्या वेळात ते अनेकवेळा डाएटसंबंधी माहिती नेटवर शोधताना दिसतात.

याविषयी अनशूर सांगते, परिधी दीदी निराेगी जीवनशैलीसाठी नेहमीच पौष्टीक आहार खाण्यावर भर देते. अनिरुद्ध भैय्या आणि ती यासंदर्भातील टीप्स एकमेकांना शेअर करतात. आपण अनुसरलेली जीवनशैली याेग्य आहे की नाही हे देखील तपासत असतात. अनिरुद्ध भैय्या त्यांना नेहमीच मार्गदर्शनह करतात. तसेच चांगला आहार घेण्यासाठी प्राेत्साहीत करतात. मी देखील त्यांच्यामुळे पौष्टीक आहाराला प्राधान्य देत आहे.

साेनी एन्टरटेनमेंट टेलिव्हीजनचा पटियाला बेब्ज शाे प्रेक्षकांना साेमवार ते शुक्रवारी रात्री नऊ वाजता पाहायला मिळतो.  


Web Title: Ashnoor and Paridhi from Patiala Babes are diet partners
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.