नजर या मालिकेत अशिता धवन दिसणार या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 05:01 PM2018-07-16T17:01:04+5:302018-07-16T17:01:53+5:30

स्टार प्लसवरील आगामी मालिका नजर हे आधुनिक भारतातील एक सुपरनॅचरल फँटसी नाट्‌य असून त्यात आपल्या मनात खोलवर दडलेली संकल्पना - वाईट नजरेवर ही मालिका गुंफण्यात आली आहे.

Ashita Dhawan in nazar serial | नजर या मालिकेत अशिता धवन दिसणार या भूमिकेत

नजर या मालिकेत अशिता धवन दिसणार या भूमिकेत

googlenewsNext

‘स्टार प्लस’वर लवकरच ‘नजर’ ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका अमानवी शक्तींवर आधारित असून ही काहीशी फॅण्टसी सदृश्य मालिका आहे. आपल्याभोवती चेटकिणींची काळोखी शक्ती लपेटून असते आणि तिचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो, अशी या मालिकेच्या कथानकाची संकल्पना आहे. या मालिकेला सर्व दृष्टीने उत्कृष्ट करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असून यासाठी ते प्रचंड मेहनत घेत आहेत.
स्टार प्लसवरील आगामी मालिका नजर हे आधुनिक भारतातील एक सुपरनॅचरल फँटसी नाट्‌य असून त्यात आपल्या मनात खोलवर दडलेली संकल्पना - वाईट नजरेवर ही मालिका गुंफण्यात आली आहे. ही गूढ शक्ती कशाप्रकारे आपल्या अवतीभवती असते आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो हे यातून दाखवले जाईल. लोकप्रिय अभिनेत्री अशिता धवन या मालिकेत एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अशिता गेल्या कित्येक वर्षांपासून मालिकांमध्ये काम करत आहे. तिने केसर या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती सपना बाबुल का... बिदाई, लेडीज स्पेशल, काला टीका यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. एवढेच नव्हे तर नच बलिये, जरा नचके दिखा यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये काम केले आहे. नजर या मालिकेत काम करण्यास अशिता खूपच उत्सुक आहे. या मालिकेविषयी अशिता धवन सांगते, “मी या मालिकेत नायकाच्या मावशीची भूमिका साकारत असून नजरचा हिस्सा बनण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे. ही मालिका अगदी वेगळ्‌या प्रकारची असून मला स्वतःला आव्हान द्यायला आवडतं. तसेच नवनवीन भूमिका साकारायलाही आवडतं, त्यामुळे एक अभिनेता म्हणून प्रगल्भ होण्यास मदत होते. इतिहासात माझ्या सर्वच मालिकांमध्ये मला तकिया कलाम मिळाला आहे. नजरमध्येही आहे. नजरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारायला दिल्याबद्दल मी निर्मात्यांची आभारी आहे.”
अशिताच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना विभिन्न प्रकारच्या व्यक्तिरेखा या मालिकेत पाहायला मिळतील. नजर ही मालिका लवकरच स्टार प्लसवर सुरू होणार आहे. 
 

Web Title: Ashita Dhawan in nazar serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.