Ashika Bhatia starrer 'Vani Rani' starrer 'Prem Ratan Dhan Payo' debut | 'प्रेम रतन धन पायो'मधील तारका आशिका भाटियाचे 'वानी रानी' मालिकेत पदार्पण

'प्रेम रतन धन पायो' या बॉलिवूडपटातून सर्वांच्या ओळखीची बनलेली आशिका भाटिया आता 'वानी रानी' या टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे. ही ठेंगण्या ठुसक्या बांध्याची आणि कमालीचे अभिनयगुण असलेली ही अभिनेत्री वानी रानी या मालिकेत बिदिशा ही भूमिका साकारताना दिसेल. 

या मालिकेतील आशिकाची भूमिका एका १९ वर्षांच्या, हळुवार बोलणार्‍या, नम्रतेने वागणार्‍या मुलीची आहे. प्रकाश अग्नीहोत्री (वानीचे पती) यांच्या घरात प्रार्थनेसाठी सगळे जमले असताना तिचा प्रवेश होतो. आपण प्रकाशच्या पत्नी आहोत असा तिचा दावा आहे आणि ही गोष्ट फक्त रानीला माहित आहे असे तिचे म्हणणे आहे. या नव्या पाहुणीने घरात आणलेल्या भावनिक वादळाचा सामना वाणी आणि रानी एकत्र मिळून करतील की हे संकट त्यांना एकमेकींपासून अधिकच दूर घेऊन जाईल?

आशिका भाटियाशी या भूमिकेविषयी संवाद साधला असता ती म्हणाली, ''हो, मी लवकरच या मालिकेत प्रवेश करत आहे आणि प्रकाश अग्नीहोत्रींची दुसरी पत्नी असण्याचा या पात्राचा दावा असणार आहे. माझ्या येण्याने या मालिकेत भरपूर नवी वळणं येणार आहेत आणि प्रेक्षकांना कथानकाचा हा भाग खूप आवडेल अशी मला आशा आहे. बिदिशाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर आहेत आणि ती केव्हा कशी वागेल याचा थांग लावणं कठीण आहे. वरकरणी ती एक नम्र, साधीभोळी मुलगी वाटते खरी पण लवकरच ती आपले खरे रंग दाखवू लागेल.''
Web Title: Ashika Bhatia starrer 'Vani Rani' starrer 'Prem Ratan Dhan Payo' debut
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.