'इंटरनेट वाला लव्ह' मध्ये होणार आसावरी जोशीची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 07:15 AM2018-12-08T07:15:00+5:302018-12-08T07:15:00+5:30

'इंटरनेट वाला लव्ह' या शो मध्ये लवकरच नामवंत अभिनेत्री आसावरी जोशी एंट्री होणार आहे. या मालिकेत आसावरी सुषमाची भूमिका साकारणार आहे.

 Asahi Joshi entry will take place in 'Internet-wide love' | 'इंटरनेट वाला लव्ह' मध्ये होणार आसावरी जोशीची एंट्री

'इंटरनेट वाला लव्ह' मध्ये होणार आसावरी जोशीची एंट्री

googlenewsNext
ठळक मुद्दे सुषमा आणि रुपा एकमेकींना चांगल्या प्रकारे ओळखत असतात

कलर्सच्या इंटरनेट वाला लव्ह ने जय (शिवीन नारंग) आणि आद्या (तुनिशा शर्मा) यांच्या नव्या युगाची प्रेमकथा सादर करून प्रेक्षकांशी बंध निर्माण केले आहेत, जे नेहमीच वेगवेगळ्या मार्गांवर चालत असणारे दिसतात. या शो मध्येलवकरच नामवंत अभिनेत्री आसावरी जोशी एंट्री होणार आहे. आसावरी सुषमाची भूमिका साकारणार आहे. सुषमा रुपाची वर्ग मैत्रिण आहे. सुषमा आणि रुपा एकमेकींना चांगल्या प्रकारे ओळखत असतात. रुपा प्रमाणेच सुषमाला सुध्दा गॉसिप करायला आवडते आणि प्रत्येक गोष्टी विषयीचे मुद्दे ती सांगत असते.

तिच्या पात्रा विषयी बोलताना, आसावरी जोशी म्हणाली, “कलर्स आणि इंटरनेट वाला लव्ह सोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. शोची तरूण आणि वेगळी कथा मला आवडली आहे, मला वाटते ही अतिशय ताजीतवानी संकल्पना आहे आणि त्यात काम करणे मला आवडले आहे. माझे पात्र असलेली सुषमा ही अतिशय उत्साही पात्र आहे आणि तिला सर्वांशी बोलायला आवडते आणि सल्ला द्यायला आवडते. सुषमाची भूमिका साकारणे थोडेसे आव्हानात्मक आहे कारण मी याआधी अशी भूमिका केलेली नाही. मला आशा आहे की माझ्या पात्रा द्वारे मी प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकेन.”

नुकताच, शो मध्ये एक कुतुहलजनक ट्रॅक पहायला मिळणार आहे ज्यात जयची माजी मैत्रिण, ऐश्वर्या आद्याला जळविण्यासाठी रुपाच्या मदतीने जयवर प्रेम असल्याचे नाटक करते. हे सर्व पाहून आद्याला कळून चुकते की तिचे जयवर खरे प्रेम आहे आणि ती पाश्चिमात्य पोशाख घालून जयला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. नेमक्या याच वेळी जयला अपघात होतो आणि तो खूप जखमी होतो. त्याच्या अपघाता विषयी कळाल्यावर आद्या अतिशय व्याकुळ होते आणि जय बरा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी ती करते. प्रेमकथा पूर्ण होण्यासाठी सम्राट आद्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न करतो.

Web Title:  Asahi Joshi entry will take place in 'Internet-wide love'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.