This artist took 1 million! | या कलाकाराने घेतले १ कोटी !

बिग बॉसच्या घरात येण्यासाठी कलाकारांना तगडी रक्कम देवून बोलाविले जाते. त्यामुळे कलाकारांना पैसा, प्रसिध्दी तर मिळते. करणलाही बिग बॉसमध्ये येण्यासाठी १ कोटी रुपये देण्यात आले आहेत. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे घरांघरांत पोहचलेला नैतिक म्हणजेच करण मेहराने तब्येत ठीक नसल्याचे कारण देत मालिकेतून एक्झिट घेतली.  नैतिक मालिकेत नसल्यामुळे रसिकांमध्येही नाराजी पसरली. अक्षरा आणि नैतिक ही रोमँटिक जोडी सर्वांचीच लाडकी होती. काही दिवसांनंतर करणने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मालिकेच्या टीमलाही विशाल सिंग या कलाकाराची नैतिक म्हणून एंट्री करावी लागली. करणने 'ये रिश्ता...'सोडल्याचे नेमके कारण काय? हे गुलदस्त्यात असताना आता हे सत्य उघड झाले आहे. काही तरी नवीन करण्याच्या शोधात असलेल्या करणला आव्हानात्मक काम करायचे होते. नैतिकच्या इमेजमधून बाहेर पडून वेगळी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात तो होता. त्यामुळेच बिग बॉस १० पर्वात करणची झलक रसिकांना पाहायला मिळाली. बिग बॉस या शोमुळे करणला एक नव्या रूपात पाहता येणार असल्यामुळे रसिकांमध्ये त्याच्याविषयी उत्सुकता आहे. विशेष म्हणजे करणने बिग बॉसच्या घरात एंट्री मारण्यासाठी 25 लाख-50 लाख नाही तर तब्बल १ कोटी रुपये घेतले असल्याचे कळते.  

Web Title: This artist took 1 million!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.